कोंढवा शिवनेरी नगर गल्ली नं १५ मधील चेतन लोणारच्या बेकायदेशीर बांधकामाला पालिकेची नोटीस परंतु शुन्य कारवाई.

0
Spread the love

चेतन लोणकर, जहिर शेख याच्या बेकायदेशीर बांधकामाला राजकीय पाठबळ.!

पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी.

कोंढवा खुर्द शिवनेरी नगर गल्ली नंबर १५ मध्ये चेतन लोणकर,जहीर शेख नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने केलेले
५ मजली बेकायदेशीर बांधकाम पूर्ण होण्याचा तयारीत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. बघता बघता ५ मजल्याचे बेकायदेशीर बांधकाम होत असतानाही पालिका त्या बेकायदेशीर बांधकामावर नियोजन पद्धतीने कारवाई करत नसल्याने हे बांधकाम करणारे सुखावले आहेत.

वेळेवरच कारवाई झाली असती तर आजही ईमारत जमिनदोस्त झाली असती. बेकायदेशीर बांधकाम करताना ८ महिन्यांत कामे पूर्ण केली जात असून झटपट पैसा कमवला जात आहे. या झटपट पैसा कमविण्याच्या नादी नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. तसेच या मिळणाऱ्या मलाईतून गुंडगिरी वाढत आहे.तर पत्रकारांना धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे.

यांच्या धमकीला आम्ही भिक घालत नाही. पोलिसांनी सदरील बांधकामाला कोणाचा धन मन लागला आहे याची चौकशी करावी, तसेच या धनाजीरावांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी अशी मागणी केली जाणार आहे.

तर त्या चेतन लोणकर याला वाचविण्यासाठी राजकरणी लोक पायपीट करत आहेत.पुणे महानगर पालिकेने वेळ न दळवता लगेचच बांधकामावर जॉकटर ने कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पालिका आता काय कारवाई करणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे. क्रमशः 

” २५ एप्रिलला पालिकेची नोटीस.. परंतु कारवाई शुन्य? “

चेतन लोणकर व त्याच्या इतर पार्टनरांना २५ एप्रिल २०२५ रोजी बेकायदेशीर बांधकाम काढून घेण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. परंतु २ महिने होत आले तरी पालिकेला कारवाईचा मुहूर्त सापडलेला नाही. पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांना भेटून कारवाईची मागणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here