पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी .
महिलेला अश्लील कृत्यासाठी ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या नराधमाला काळेपडळ पोलिसांनी अटक काळेपडळ पोलीस ठाण्याच्या कारवाईमुळे महिलेला अश्लील कृत्यासाठी ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या नराधमाला अटक.आरोपी जावेद रफिक नबी, वय: ३८ वर्ष या फसवेखोराला एका महिलेचा मॉर्फ केलेला अश्लील फोटो आणि व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करून पैसे व लैंगिक शोषणाची मागणी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
आरोपीने पीडित महिलेचा छळ करत, तिचे खाजगी फोटो व बनावट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला आर्थिक व शारीरिक पातळीवर त्रास दिला. इतकेच नव्हे तर त्याने पीडितेवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न देखील केल्याचे उघडकीस आले आहे
या प्रकरणात आरोपीची पत्नी शाहीस्ता नबी हिचीही सक्रिय भूमिका समोर आली असून, तिने पतीच्या बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ दिले आहे. हे पहिलेच प्रकरण नाही. राहेजा गार्डन (फेज ३) व अर्चना पॅराडाईज सोसायटी येथे देखील त्याने अशाच प्रकारे महिलांचा छळ केल्याचे समोर आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्याची पत्नी शाहीस्ता महिलांना धमकावत असे, जेणेकरून त्या पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत.
या कारवाईसाठी काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी म्हटले: “महिलांनी अशा फसवेखोर व ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये. पोलिसांवर विश्वास ठेवा, आम्ही तुमचे रक्षण करू. तक्रारदार महिलेची ओळख गोपनीय ठेवली जाईल व आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिलराजे निंबाळकर करत असून त्यांनी जनतेला आवाहन केले: “महिलांनी कुठल्याही प्रकारच्या छळास घाबरू नये. निर्भयपणे तक्रार करा — कायदा तुमच्या पाठीशी आहे.”
हे प्रकरण केवळ एका महिलेशी संबंधित नसून, महिलांच्या सुरक्षिततेचा आणि राज्यातील वाढत्या डिजिटल गुन्ह्यांचा गंभीर इशारा आहे. आरोपीची अटक म्हणजे कायद्याचा विजय व न्यायालयीन प्रक्रियेचा दृढ विश्वास आहे.
पीडित महिलेचे वडील, भारतीय लष्करातून निवृत्त अधिकारी, यांनी भारतीय न्याय संहिता (BNS), ॲसिड अटॅक प्रतिबंधक कायदा आणि सायबर क्राईम कायद्यान्वये कठोरात कठोर कारवाईची मागणी करत स्पष्टपणे सांगितले:
“पुन्हा कोणत्याही महिलेला गप्प बसून त्रास सहन करावा लागू नये. हे प्रकरण सर्व गुन्हेगारांसाठी इशारा ठरावे की, कोणीही कायद्याच्या हातून सुटू शकत नाही.”