पारगे नगर मधील धोकादायक बांधकाम पाडण्याची मागणी.
पालिकेने तात्काळ एम.आर.टी.पी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
कोंढव्यात बेकायदेशीरपणे बांधकामे चालू असलयाने पुणे महानगर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर पुणे महानगर पालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून पाठ फिरवताच पुन्हा धोकादायक बांधकाम चालू करून फ्लॅट विक्री सुरू केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात पुणे महानगर पालिका बांधकाम विभाग झोन २, ने कोंढवा खुर्द पारगे नगर मधील सर्वे नं ३८/३ /२ अनधिकृत बांधकामावर कारवाई करून सदरील स्लॅब तोडण्यात आले होते.
पालिकेने सरसकट एका बाजूचे स्लॅब तोडून, सदरील पुर्ण बांधकाम उतरुन घेण्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु अधिकाऱ्यांच्या आदेशाला पायदळी तुडवून पुन्हा धोकादायक बांधकाम करून मोकळे होत असल्याचे मिळालेल्या माहितीतून दिसून येते आहे.
पारगे नगर सर्वे नं ३८/३/२ मध्ये “साजीद व बाबा” नावाच्या व्यक्तीचे बांधकाम चालू असून त्या बांधकामावर पालिकेने गेल्या आठवड्यात कारवाई केली आणि कारवाई दरम्यान सदरील संपूर्ण स्लॅब ला होल मारण्यात आले होते. होल पुर्णपणे मारल्याने पुन्हा स्लॅब भरणे अवघड होते. परंतु साजीद व बाबा याने पुन्हा स्लॅब भरण्याचे काम चालू केले आहे.
तो भरलेला स्लॅब धोकादायक असल्याने, त्याठिकाणी सौम्य भुकंपाचा धक्का लागला तर, सदरील बेकायदेशीर बांधकाम पत्त्या सारखे खाली कोसळू शकते? तर यात मोठ्ठ्या प्रमाणावर जीवीत हानी होऊ शकते यात शंकाच नाही. विशेष म्हणजे त्या बेकायदेशीर बांधकाम मधील निम्मे फ्लॅट विकले आहे.
ज्यांनी फ्लॅट विकत घेतले आहे ते स्वताचा जीव धोक्यात घालत आहेत. तर नागरिकांनी सदरील बेकायदेशीर बांधकामामध्ये फ्लॅट खरेदी करू नये असे आव्हान पुणे महानगर पालिकेने केले आहे. तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहणी करून सदरील बेकायदेशीर व धोकादायक बांधकाम तातडीने पाडण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
तसेच बाबा याचे चेतना गार्डन, भाग्योदय नगर व इतर ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम चालू असल्याने पालिकेने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.तर बाबा याने पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींना धमकी दिल्याने त्या विरोधात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे त्याच्या गुनहेगारीचा व त्याला बांधकाम करण्यासाठी पैसे पुरविणाऱ्यांचे पुरावे देऊन कडक कारवाईची मागणी केली जाणार आहे.
गुन्हेगारच करतायेत बेकायदेशीर बांधकाम? तर नागरिकांची फसवणूक?
कोढवा मध्ये गुन्हेगारी वाढता वाढता वाढत असल्याने प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. तर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त गुन्हेगार वृत्तीचे लोक बांधकाम करत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात सर्वे नं ३८/३/२ मध्ये बांधकाम करणारे साजीद व बाबा हे गुनहेगार असून हे बेकायदेशीर बांधकाम करत आहे. यातील साजीद हा जेलमध्ये असल्याने संपूर्ण कामकाज बाबा पाहत. साजीद व बाबा याने पारगे नगर मध्ये इमारत बनवून एकाचे दुसऱ्याला व दुसऱ्याचे तिसऱ्याला फ्लॅट विकल्याची माहिती मिळाली आहे.