पुण्यातील नागरिकांकडून सक्तीने कर वसूल करणारी पुणे महानगरपालिका पुनित बालन यांच्या तीन कोटी २३ लाख वसुली प्रकरणा बाबतीत गप्प का? अनधिकृत जाहिरात प्रकरण.

0
Spread the love

एक वर्ष होत आले तरी एक रूपया वसुल केला नसल्याचे माहिती अधिकारात आले समोर.

पुणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे हात ओले झाल्यानेच वसुलीस टाळाटाळ?

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

सर्व सामान्य नागरिकांकडून इमानदारीने कर वसुली करणारी व कर न भरणाऱ्या विरोधात सील ठोकणारी पुणे महानगर पालिका पुनित बालन यांच्या कोट्यवधी रुपयांच्या वसुलीवर गप्प बसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

लाख -दोन लाख नागरिकांचे कर थकीत असल्याने प्रमाणिक पणे सील ठोकून मोकळे होणारे कर संकलन अधिकारी माधव जगताप, पुनित बालन यांच्या अनधिकृत जाहिरात फलक संदर्भात वर्ष होत आले तरी मुग गिळून गप्प बसले आहेत.

येत्या दहीहंडीलागणेशोत्सवाला वर्ष होत आले आहे. मागच्या वर्षी दहीहंडी व गणेशोत्सवाला पुनित बालन यांच्या माणिकचंद ॲक्सेसरिक कंपनीने पुणे शहरात ठिकठिकाणी विना परवाना जाहिरातबाजी केली होती.

त्यानंतर पालिकेने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी ३ कोटी २३ लाख रुपयांची वसुलीची नोटीस पुनित बालन ग्रुपला पाठवली होती. १० महिने पुर्ण झाले असले तरी पुणे महानगर पालिका वसुली करण्यात अशक्षम झाली आहे. जेव्हा पुनित बालन यांच्या कडून ३ कोटी २३ लाख वसुली करण्यास पालिकेत हिम्मत नाही? तर गरीबांच्या दारात जाऊन बँड बाजा वाजवण्याची हिम्मत पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आहे? परंतु बालन यांच्या कार्यालयासमोर बँड बाजा वाजवण्याची हिंमत दाखवली नाही ?

विशेष म्हणजे पालिकेच्या करसंकलन कर उपायुक्तांनी ३ ऑक्टोबर २०२३ नंतर पुन्हा बालन ग्रुपला नोटीस काढण्याची हिम्मत दाखवली नाही? पुनित बालन यांनी जाहिराती संदर्भात १ रूपयाही अद्यापही भरला नसल्याने, अनेक तक्रारी, माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागण्याचे काम सजग नागरिक करत आहे. परंतु लोटांगण घातलेल्या अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवावी? असा प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केला आहे. सदरील प्रकरणाबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here