बांधकाम विभागाची कारवाई करण्यास टाळाटाळ.
पुणे महानगर पालिका व महारेराची देखील फसवणूक?
सदरील बांधकाम व्यावसायिकाला मदत करणारे पोलिस अधिकारी कोण?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
पुणे महानगर पालिकेतील बांधकाम विकास विभागाची परवानगी घेऊन अनधिकृत बांधकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील प्रकार हा सर्वे नं ५१ गुरूवार पेठ येथील मिळकतीत झाला आहे. ५१ गुरूवार पेठेत नोबेल कंट्रकशन ला पुणे महानगर पालिकेने एकुण १३ हजार २०० स्क्वेअर फुटाची परवानगी दिली होती.
परंतु सदरील नोबेल कंट्रकशनने मनपाच्या परवानगी व्यतिरिक्त ३५०० स्क्वेअर फूट जास्त बांधकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करताना व्हेंटिलेशन साठी,चेंबर लाईनसाठी नियमानुसार डक्ट सोडणे बंधनकारक असतानाही, सदरील ठिकाणी डक्ट बुजविल्याचे दिसून आले.
याबाबत पुणे महानगर पालिकेकडे लेखी तक्रार केली असता तब्बल १ महिन्या नंतर बांधकाम विकास विभाग झोन ५ , यांनी नोटीस काढून १५ दिवसांत खुलासा करण्याची नोटीस काढली होती. परंतु आज दिड महिना झाला असला तरी पुणे महानगर पालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
तसेच या संदर्भात कनिष्ठ अभियंता हबीब सय्यद यांना संपर्क साधला असता, ते म्हणाले सदरील बांधकाम व्यावसायिकाने रिवाइज प्लॅनसाठी फाईल टाकली आहे. परंतु सदरील फाईल प्रलंबित आहे. तर आम्ही दंड वसूल करून ते नियमात करु? अधिकारीच लोकांना वेळयात काढत आहेत. किंवा तेच वेळ्यांचा सोंग घेत आहेत.
डक्ट बुजवले असताना कस काय रिवाइज प्लॅन होऊ शकतो? दंड वसुल करून बेकायदेशीर बांधकाम नियमात केले जात असेल तर मग पुणे शहरातील हजारो बेकायदेशीर बांधकाम धारकांकडून दंड भरून नियमात का केले जात नाही? हा महत्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यात पुणे महानगर पालिकेतील अधिकारी व बांधकाम व्यावसायिकाचे साटेलोटे तर नाही ना? परवानगी पेक्षा अधिक बेकायदेशीर बांधकाम केल्याने २ कोटी ९७ लाखांच्या पुढे बांधकाम व्यावसायिकाचा फायदा होणार आहे.
मग पालिका दंड तरी किती वसुल करणार? पुणे महानगर पालिकेतील बेजबाबदार अधिकारी कर्मचारी आज पालिकेचे नुकसान करून बांधकाम व्यावसायिकाचे भले करत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. बांधकाम विकास विभागाचा भोंगळ कारभाराचा पाडा पुणे महानगर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना दोन दिवसांत भेटून वाचणार आहे.