राजीनामा दिल्यानंतर रुपाली ठोंबरे यांची पहिली प्रतिक्रिया.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, पुणे शहरातील डॅशिंग व रोखठोक असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे यांनी मनसेच्याच दोन जणांमुळे पक्ष सोडत असल्याची पहिला प्रतिक्रिया दिल्याने काल पासून पुणे शहरातील वातावरण तापले आहे.
भक्कम पणे मत मांडणारी रूपाली ताई यांना पक्षातील दोन नेत्यांमुळे कश्या प्रकारे त्रास दिला जातोय.या संदर्भात रूपाली ठोंबरे-पाटील यांनी वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
रूपाली ठोंबरे-पाटील यांना प्रश्न विचारला की नगरसेवक वसंत मोरे, अनिल शिरोदे, बापू वागसकर, किशोर शिंदे यापैकी कोणत्या दोन जणांनमुळे पद सोडला,तर रूपाली ठोंबरे यांनी बापू वागसकर, किशोर शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.
फायर ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रूपाली ठोंबरे-पाटील हे आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे समर्थकांचे आणि पुणेकरांचे लक्ष लागून राहणार आहे.