पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
जसे जसे मतदानाची वेळ जवळ येत आहे तस निवडणूकीचे वातावरण तापताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त कसबा निवडणूकीकडे लक्ष वेधले असताना, आता आरोप प्रत्यारोप होत आहे. तर काही ठिकाणी साम, दाम, दंड भेदचा वापर होत असल्याची चर्चा आहे. तर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपकडून कार्यकर्त्यांना दमदाटी केली जात आहे.
भाजपकडून दहशत निर्माण केली जात असून या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे.या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मंगळवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भानुदास माली, अमित मेश्राम आदी या वेळी उपस्थि होते.
पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपकडून मतदारसंघात दहशतीचे वातावरण निर्माण केला जात आहे भाजपचे खासदार मंत्री दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. भाजपचे खासदार, मंत्री,आमदार गाड्यांमधून फिरत आहेत. त्यांच्याबरोबर गुंड प्रवृत्तीचे काही जण आहेत. ते कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मतदारांना प्रलोभने आणि आमिष दाखविण्याचे प्रकार सुरू झाले असल्याचे नाना पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे.
दत्तवाडी, गंज पेठ , लोहियानगर परिसरात पैसै वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत .पोलिसांच्या नावाने कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे,असे पटोले यांनी निवेदनात म्हटले आहे.पोलिसांच्या नावे दूरध्वनी करणाऱ्यांचा शोध घ्यायला हवा.पोलीस यंत्रणेचा वापर भाजप करत आहे.पोलीस आयुक्तांनी आचारसंहितेचा भंग होऊ नये , याची काळजी घेणे गरजेचे आहे , असे पटोले यांनी निवेदनात नमूद केले आहे.