रेशनिंग दुकानदाराने कारचे ४ ही टायर बदलले ते अधिकारी कोण?
पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी
अन्न धान्य वितरण कार्यालयातील अनेक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर येत आहे रेशनिंग दुकानदारांची चांगलीच धुलाई करायची मग त्याच्याकडून स्वतःचे आर्थिक लाभ कसे करून घ्याचे असे प्रकार मध्यंतरी खुपच वाढले आहेत. सध्या अन्न धान्य वितरण कार्यालयात दोन काळू बाळू व एका मॅडम ची बरीच चर्चा सुरू आहे.
अन्न धान्य वितरण कार्यालयातील एका महिला अधिकारीने गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वताच्या चारचाकी कारचे जुने टायर अन्न धान्य क” परिमंडळ विभागाच्या अखत्यारीत येणा-या पाटील स्टेट, संगमवाडी येथील रेशनिंग दुकानदाराकडून नवीन टायर बदलून घेण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
तर ज्या दुकानदाराने हजारो रूपये खर्च करून टायर बदलले, त्याच दुकानदाराला नंतर कामाला लावून त्याचेवर जीवना आवश्यक वस्तू कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने दुकानदाराकडून रोष व्यक्त केला जातो आहे. म्हणजे स्वतःचे हित जपायचे व उलंगट आले तर कारवाई करून मोकळे व्हायचे? असा रोष काही दुकानदारांनी पुणे सिटी टाईम्सकडे व्यक्त केला आहे.
शासकीय अधिकारी असो की कर्मचारी यांनी स्वतःसाठी एखादी भेटवस्तू घेतली तर ती एकप्रकारे “लाचच” म्हणटली जाते. मग अशा टायर बदलून गिफ्ट घेणाऱ्या महिला अधिका-यावर कारवाई केली जाणार का? अशी चर्चा सध्या पुणे अन्न धान्य वितरण कार्यालयात रंगली आहे. क्रमशः




