पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील शंकरशेठ रोडवरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.गुन्हे शाखा युनिट-३ कडील कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना बातमी मिळाली की,
पुणे शहरातील रेकॉर्ड वरिल गुन्हेगार गणेश रायचुर ह्यांची सराईत गुन्हेगारांची टोळी ही शंकरशेठ रोड वरील भारत पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची तयारीत आहे.
प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली आरोपींना पकडण्यासाठी शंकर शेठ रोड वरील भारत पेट्रोलियम, पेट्रोल पंपावर समोरील चुन्नी कृपा बिल्डींगचे बाजुला लोहीयानगर येथील रोडवर दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
१) गणेश मल्लेश रायचुर वय २७ वर्षे रा. रुम नं १००४, डी बिल्डींग, राजीव गांधी सोसायटी ,एस आर एस बिल्डींग, कात्रज, २) सागर राजु अवघडे, वय ३० वर्षे रा. ५४, ई पी. म्हसोबा मंदीरासमोर, लोहीयानगर, ३)सादिक फिरोज खान. वय २२ वर्षे रा. ५४, बी पी. राममंदीराचे मागे, लोहीयानगर, ४) सुरज नंदु सकट, वय २२ वर्षे, रा. ५४, ई पी. म्हसोबा मंदीरासमोर, लोहीयानगर, तर सापळ्याचे वेळी आंधाराचा फायदा घेवुन पाचवा आरोपी मन्या पळुन गेला आहे.
ताब्यात घेण्यात आले आरोपीचे कब्जातुन एक लोखंडी सत्तुर, नायलॉनची दोरी, मिरची पावडरची पुडी, एक मोपेड दुचाकी,मोबाईल, चाव्या अशी एकूण ४१हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर यांनी फिर्याद दिल्याने आरोपींविरुध्द खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक, डी,बी,काळे हे करीत आहेत.