भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू होता मटका,जुगार ; भारती विद्यापीठ पोलीस अनभिज्ञ होते का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील कात्रज दत्तनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये बिनधास्तपणे चालणाऱ्या पत्याच्या क्लबवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापेमारी करून कारवाई केली आहे. १६ फेब्रुवारी कात्रज दत्तनगर सर्व्हिसरोड, आनंद दरबार ट्रस्ट समोर कात्रज येथे पत्र्याचे शेड मध्ये बेकायदेशीर मटका जुगार धंदा चालु असल्याची माहिती मिळाली.
सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता कल्याण मटका जुगार व पंती पाकोळी सोरट जुगार घेत असताना व जुगार खेळत असताना १० जण मिळुन आले.
त्यांना ताब्यात घेवुन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात रोख रूपये २५ हजार आणि जुगाराचे साहित्य मिळुन आले आहे. १० जणांन विरूध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० जणांना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलीस उप-आयुक्त श्रीनिवास घाडगे,गुन्हे यांचे आदेशप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके,
पोलीस अमंलदार बाबा कर्पे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण, प्रफुल्ल गायकवाड यांनी केली आहे.