पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पुणे सिटी टाईम्स ( PCT) प्रतिनिधी, पुण्यातील एका महिलेवर बांधकाम व्यावसायिकाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार व्यावसायिकावर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
भारत देसडला असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेने भारत देसडला यांच्यावर केला आहे. पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत