सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई.
पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी. हडपसर मधील मटका किंग बैजू बिनावत याच्या मटक्याच्या धंद्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली आहे. हडपसर परिसरात वर्धमान टाउनशिप स.नं.४४ हडपसर येथे बिल्डींग मधील गाळा नं. १ मध्ये सुरु असलेल्या मटका जुगार पैशावर गैरकायदेशीररित्या खेळत असलेचे निदर्शनास आल्याने पंचा समक्ष छापा टाकण्यात आला,
तर जुगार खेळणारे ३, खेळवणारे २, व पाहिजे आरोपी २ असे एकुण ७ इसमांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ (अ), ५ कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
१) शाहरुख मन्जुर शेख, वय – ४५ वर्षे धंदा-जुगार रायटर रा.-गल्ली नं.१७ सय्यद नगर,हडपसर,२) राजु अंबादास शेरला, वय – २९ वर्षे, धंदा – जुगार रायटर, रा.ससाने नगर, म्हाडा कॉलनी,एच ११७, हडपसर,३) बैजु बिनावत धंदा जुगार मालक, रा सातव नगर, हडपसर,४) नितीन भस्मे धंदा जुगार मॅनेजर रा-दरवडे वस्ती, हडपसर, ५) लक्ष्मण महादेव रामजी वय, ५८ वर्षे, रा. काळेपडळ, रेल्वे गेट जवळ हडपसर,६) परशुराम बाळु काळे, वय – ३८ वर्षे, रा. संयुक्त कॉलनी, काळेपडळ हडपसर, ७) भागवत बालाजी दमपसोरे वय-२७ वर्षे रा. वैदवाडी, हडपसर,असे जुगार खेळताना मिळुन आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ हजार २५९ रूपयाच्या मुद्देमाला सह त्यामध्ये रोख ३ हजार २५० जुगार साहित्य तसेच ५ मोबाईल हॅडसेट १९ हजार ,व अन्य जुगाराचे साहित्यासह अटक करण्यात आले असून बैजू बिनावत हा फरार झाला आहे. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच सामाजिक सुरक्षा विभागा कडील पोलीस उप-निरिक्षक सुप्रिया पंढरकर पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, हनमंत कांबळे, इरफान पठाण,आश्विनी केकाण, चव्हाण यांनी केली आहे.