आर्थिक दंडाची शिक्षा,ख-या अर्थाने मिळाला पिडीत बालिकेस न्याय. ( crime news)
पुणे सिटी टाईम्स : पुणे, ५ वर्षांपूर्वी बाल लैंगिक अत्याचारा अंतर्गत दाखल गुन्हयातील आरोपीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.अखेर पिडीत मुलीस न्याय मिळाला आहे. हकीकत अशी की राकेश हिरामन चव्हाण, ( Rakesh hiraman Chavan ) वय-२४ वर्षे, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे याने २५ जानेवारी २०१६ रोजी लग्नाचे अमिष दाखवुन एरंडवणा माध्यमिक शाळा,नळस्टॉप चौक येथुन मुलीस पळवुन नेऊन गोसावी वस्ती येथील स्मृतीबन डोंगरावर पिडीत मुलीच्या मनाचे विरुध्द जावुन जबरदस्तीने शरीर संबध केले,
असल्याने पिडीत मुलीची आईने दिलेल्या तक्रारीवरुन डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास डेक्कन पोलीस ठाणे ( Deccan police station) कडील तत्कालीन पोलीस उप निरीक्षक शिल्पा लंबे (सध्या-सहा. पोलीस निरीक्षक नेमणुक- विशेष शाखा, पुणे शहर) त्यांचे दफ्तरी पोलीस हवालदार जाधव, (सध्या- सहा. पोलीस फौजदार नेमणुक- पिंपरी चिंचवड आयुक्तालय) पोलीस नाईक नलिनी क्षिरसागर (सध्या नेमणुक- वाहतुक शाखा,पुणे शहर) यांनी मिळुन गुन्हयाचा तपास पुर्ण करुन दाखल गुन्हयातील आरोपी विरुद्ध भरपुर व सबळ पुरावा उपलब्ध करून आरोपी विरुद्ध न्यायालयात (court) दोषारोप पत्र ( charge sheet) पाठविण्यात आले होते.
विशेष न्यायाधिश सत्र न्यायालय, शिवाजीनगर पुणे यांनी सदरची केस बोर्डवर घेवुन सदर केसची सुनावणी सुरु करुन दाखल गुन्हयातील फिर्यादी, पिडीत मुलगी, पंच, साक्षीदार, डॉक्टर व इतर तज्ञ साक्षीदार यांची जबाणी नोंद करुन व दाखल गुन्हयातील तपासामधील उपलब्ध कागदोपत्री पुराव्याची खातरजमा करुन अति. सत्र न्यायाधीश बी.पी. क्षिरसागर शिवाजीनगर न्यायालय, पुणे यांनी स्पेशल चाईल्ड प्रोटेक्शन मधील आरोपी राकेश हिरामन चव्हाण, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर, यास फौजदारी प्रक्रीया संहिता कलम २३५(२) प्रमाणे दोषी ठरविले आहे.
१) भादंवि कलम ३६३ मध्ये ३ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी. २) भादंवि कलम ३७६ मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी. ३) बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ मध्ये १० वर्षे सक्त मजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी.
४) बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ६ मध्ये २० वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात सुनावणी दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी सहा. पोलीस फौजदार एस. डी. राक्षे व पोलीस हवालदार डी. वाय. गायकवाड यांनी काम पाहिले आहे.