शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा ( FIR) दाखल.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी, आजकाल पुणे महानगर पालिकेतील अनेक भ्रष्टाचार बाहेर पडत आहे. बोगस बिले तयार करुन आता पालिकेला गंडा घातला जात आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे.
अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन कामे झाल्याची दाखवून पुणे महापालिकेची ९९ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा ( FIR) दाखल करण्यात आला आहे.
काल गुरूवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला धारेवर धरले होते.त्यानंतर महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली.
याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीवरून योगेश चंद्रशेखर मोरे रा. गणेश पार्क,सिंहगड रोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १० फेब्रुवारी ते २१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.पुणे महापालिकेच्या बाणेर, कोथरुड, तसेच नवी पेठेमधील वैकुंठ स्मशानभूमी
येथे विद्युत विषयक कामे केल्याचे एकूण ९९ लाख ८ हजार रुपयांची खोटी बनावट बिले तयार करुन ती खरी आहेत, असे भासविले.
अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व शिक्के मारुन परस्पर कार्यालयीन जावक करुन आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी ही खोटी बिले पाठविली.ही बिले मंजूर करुन महापालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे,
कोरोना काळात विना निविदा एक कोटी रुपयांची काम झाल्याचे दाखवून त्याचे बिल मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. याप्रकरणी मुख्य सभेत गुरुवारी जोरदार आंदोलनही करण्यात आले.
विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला व प्रशासनाला जाब विचारला होता.
त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी दक्षता विभागाची समिती स्थापन करण्यात येईल. फौजदारी कारवाई व प्रशासकीय चौकशी करण्यात
येईल,
असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले होते.त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.
.