पुणे : अखेर त्या मुलींना मिळाला न्याय.. कोथरूड पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, श्रुती कढणे सहित इतरांवर गुन्हा दाखल.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे शहरात एक प्रकरण चांगलेच गाजले, संभाजीनगर मधील पोलिसांनी कोथरूड पोलिस ठाणे गाठले आणि ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन अन् महिलांसोबत गैरकृत्य केल्याचा आरोप देखील झाला. त्यावर कारवाई व्हावी यासाठी थेट पोलिस आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले परंतु पुणे पोलिसांनी त्यावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भरपूर कष्ट घेतले. परंतु न्यायालयाने अखेर त्या महिलांची बाजू ऐकून घेतली अन कोथरूड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रेमा पाटील,श्रुती कढणे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल कामठे, पोलिस कर्मचारी संजीवनी शिंदे,सायबर विभागाचे पोलिस अधिकारी धनंजय सानप, पोलिस कर्मचारी विनोद परदेशी, कोथरूड पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील, पोलिस शिपाई श्रुती कढणे, छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त पोलिस कर्मचारी सखाराम सानप आणि एपीआय प्रेमा पाटील यांची एक मैत्रिण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पोलिसांची नावे आहेत.

कोथरुडमधील तीन मुलींसोबत तपासादरम्यान पोलिसांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.त्यानंतर संबंधित मुली आणि विविध संघटनांकडून पुणे पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी त्या तीन मुली आणि आंदोलन कर्त्यांवरच गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर संबंधित मुली आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशा आंदोलनकर्त्यांनी पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आणि या प्रकरणाचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर देखील न्यायालयाने सहा पोलिस अधिकाऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

       ” न्यायालयातील चर्चा ” 

संबंधितांवर दरोडा, अपहरण, अॅट्रॉसिटी आणि अन्य कलमांन्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नाही. त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावर अपमान केला, असं कोर्टानं म्हटलं आहे. या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलींसह त्यांना या लढ्यात साथ देणारे शनिवारी सकाळी कोथरूड पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांवर बीएनएस कलम ३१०(२), १४० (३), ७४, ३३३, ६२, ११५(२), ३५२, ३५१ (३), ३(५) यासह अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ अन्वये ३ (१) (r), ३(१) (ड), ३(१) (w) (i), ३(१) (w) (ii) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here