पुणे अन्न धान्य वितरण कार्यालयातील सावळागोंधळ चव्हाटयावर.! थेट विभागीय आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली?

0
Spread the love

काळू, बाळू आणि त्या मॅडमनी बदल्या करण्यासाठी मदत केल्याने विभागीय पुरवठा उपायुक्तांना स्वतः लक्ष घालण्याची आली वेळ?

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागितला होता खुलासा, परंतु त्या खुलासाचे झाले तरी काय?

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

अन्न धान्य वितरण कार्यालयात मनमानी कारभार सुरू असल्याची ही काय नवीन बाब नाही, तर आता थेट परस्पर बदल्या करून मोकळे होताना दिसत आहे. याबद्दल थेट स्थगिती मिळावी यासाठी वरिष्ठांना पत्रव्यवहार करावा लागत असल्याचे समोर आले आहे. अन्न धान्य वितरण कार्यालयातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. अन्न धान्य वितरण अधिका-यांना बदल्या करण्याचा अधिकार नसतानाही तब्बल १३ लोकांच्या बदल्या केल्याचे उघड झाले आहे.

हकीकत अशी की तत्कालीन अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सहाय्यक,लिपिक व अव्वल कारकून अश्या १३ लोकांची बदली केली होती. त्या बदली मुळे अनेक वादविवाद झाले तर आर्थिक देवाणघेवाण करून बदल्या करण्यात आल्याची चर्चा अन्न धान्य वितरण कार्यालयात रंगू लागली. त्यात काळू बाळू व एका महिला तहसीलदार सहभागी असल्यानेच सदरील बदल्या करण्यात आल्या होत्या, याची कुणकुण विभागीय उपायुक्त पुरवठा यांनी लागताच, अधिक माहिती घेतली असता खरोखरच बदल्या करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने उपायुक्त पुरवठा यांनी अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी घेतली होती.

तर १० जानेवारी २०२३ रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्थगिती दिली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढलेल्या आदेशात पुढील नमूद आहे की,अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे यांचे कार्यालयातील पुरवठा निरीक्षक या संवर्गाचे कार्यभार हस्तांतरणाबाबत आपल्या कार्यालयाचा आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे यांचे कार्यालयातील पुरवठा निरीक्षक या संवर्गाचे कार्यभार आदेश क्र. अविअ/आस्था/कावि/१८१/२०२२दि. ४/११/ २०२२ whatsapp व्दारे प्राप्त झाला आहे. उक्त आदेशामध्ये ४ पुरवठा निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.पुरवठा निरीक्षक यांचे नियुक्ती व सक्षम प्राधिकारी हे विभागीय आयुक्त आहेत. सबब पुरवठा निरीक्षक यांच्या बदल्या करतांना या कार्यालयाची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे.


तथापि आपण सदरची परवानगी न घेता पुरवठा निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्र शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणा-या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदींचा भंग केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून सदरील आदेशास पुढील आदेश होईपर्यंत स्वगिती देण्यात येत आहे.आपली ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र असून आपणाविरुध्द शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नवे याबाबतचा आपला खुलासा सदरचा आदेश प्राप्त झाल्यापासून दोन दिवसात या कार्यालयास सादर करावा.असे अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना काढलेल्या आदेशात नमूद होते.

परंतु तरीही अद्यापही अन्न धान्य वितरण कार्यालयाने बदली रद्द केलेली नाही. व बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वत केलेले नाहीत? आणि विषेश म्हणजे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबतीत २ दिवसात खुलासा मागितला होता. परंतु तो खुलासाच केला नसल्याची माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयातून मिळाली आहे. म्हणजे थेट विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याने उलटसुलट चर्चा अन्न धान्य वितरण कार्यालयात सुरू असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.आणि त्या काळ,बाळू आणि त्या मॅडमची कुंडली तपासून कारवाई होणार आहे का? अशी चर्चा अन्नधान्य वितरण कार्यलयात रंगली आहे.तर पुरवठा उपायुक्त काय कारवाई करणार याकडे लक्ष राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here