पुणे हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांना शासनाने केली निलंबित; हडपसर येथील जमिन प्रकरण भोवले

0
Spread the love

विभागीय आयुक्तांनी शासनास पाठविला अहवाल.

त्यांनी त्यांच्या मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या आलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहेत.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे हवेली तहसिलदार तृप्ती उमेश कोलते पाटील यांना निलंबित करण्यात आल्याने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे.तृप्ती कोलते, तहसीलदार यांनी मौजे-हडपसर, १) हवेली,पुणे येथील सं.नं.६२ या जमिनीबाबतच्या तत्कालीन महसूल मंत्री यांच्या आदेशाची खातरजमा न करता तसेच, शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय, जिल्हाधिकारी,यांचे आवश्यक असणारे मार्गदर्शन / अभिप्राय / आदेश प्राप्त न करता कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन संबंधित अर्जदारास राखीव वन या संवर्गातील जमीन अनाधिकाराने प्रदान केल्याचा आदेश दिनांक १२.०७.२०२१ रोजी पारित केला असल्याचे दिसून आले आहे.

२) त्याचबरोबर २३ मे २०२२ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या अहवालावरून तृप्ती कोलते, तहसीलदार यांनी कोव्हिड-१९ या विषाणूच्या संसर्गजन्य गंभीर परिस्थितीत जिवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना व आवश्यक सेवासुविधा प्राप्त करून घेताना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या १ डिसेंबर २०१६ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार विहीत कार्यपध्दतीचा अवलंब न करून वित्तीय अनियमितता केल्याचे निदर्शनास आले आहे.

३) तसेच, विभागीय आयुक्त, पुणे यांनी संदर्भिय क्र.३ येथील २.जून २०२२ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या अहवालावरून तृप्ती कोलते,तहसीलदार तथा व्यवस्थापकीय अधिकारी, पुणे शहर यांनी प्रकाश बिजलानी व इतर यांच्या प्रकरणात नियमबाह्य पध्दतीने कामकाज केले असल्याचे दिसून आले आहे.

या शिवाय कोलते यांच्याविरुद्ध निवडणूक विषयक कामकाजाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारी या गंभीर स्वरुपाच्या असल्याचे निदर्शनास आलेले आहे.उक्त अनियमितता या गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे तृप्ती उमेश कोलते यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला होता.

त्यानुषंगाने आता या आदेशान्वये तृप्ती कोलते,यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार या आदेशान्वये निलंबित करण्यात येत असून, पुढील आदेश काढले जाईपर्यंत
त्या निलंबित राहतील. असे संजीव राणे शासनाचे अवर सचिव यांच्या आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here