“पुणे महानगरपालिकेने ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले! पालिकेत खळबळ.”

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेने (PMC) ऐन दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बांधकाम विभागातील दोन कर्मचाऱ्यांना, कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ यांना निलंबित केले आहे.

बाणेर येथील मालमत्ता क्रमांक २१६, हिस्सा नंबर ६ येथील एका इमारतीच्या बांधकामाला फक्त पाच मजल्यांची परवानगी होती, परंतु सहावा आणि सातवा मजला बेकायदेशीरपणे बांधला गेला. या बेकायदेशीर बांधकामाची माहिती या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कळवली नाही, ज्यामुळे त्यांच्यावर कामात कुचराईचा ठपका ठेवण्यात आला.

आयुक्त नवल किशोर राम यांनी ही बाब गंभीर्याने घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांना खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार, २० ऑक्टोबर २०२५ पासून या दोघांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे, आणि आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here