पुण्यातील पोलिस कर्मचारीच निघाला ठगसेन, महिलांची लाखोंची फसवणूक. कोथरूड, चतुश्रिंगी,भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

0
Spread the love

फसवणूकीचे ३ गुन्हे दाखल तरीही अद्यापही बडतर्फ का करण्यात आलेले नाही?

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी.

नागरिकांना गोड गोड बोलून विषेश करून महिलांची फसवणूक करणारा ” ठगसेन” पोलिस कर्मचाऱ्यावर तीन तीन गुन्हे दाखल झाल्याचे समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

गणेश अशोक जगताप वय ५२ . कावेरी नगर पोलिस वसाहत,वाकड असे गुन्हा दाखल झालेल्या ठगसेन चे नाव आहे.

एकाच वसाहतीत राहत असल्याचा फायदा घेऊन सासरी गेल्या महिलेला पत्नीला कॅन्सर झाल्याची बतावणी करुन तिच्याकडून अडीच लाख रुपये व ६ तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोलीस अंमलदाराने फसवणुक केल्याचा कारनामा समोर आला आहे. राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करुन फसवणुक करण्याबरोबरच गणेश जगताप याच्यावर यापूर्वी किमान ३ गुन्हे दाखल आहेत.

याबाबत सुखसागरनगरमध्ये राहणाऱ्या एका ४३ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे वडिल पोलीस खात्यात असल्याने त्या औंध येथील बॉडी लाईन पोलीस वसाहतीत रहात होत्या त्यामुळे त्या गणेश अशोक जगताप याला ओळखत होत्या. दोन्ही कुटुंबाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते.

त्या डिसेंबर २०१९ मध्ये सासरी नारायणगाव येथे असताना गणेश जगताप याने त्यांना फोन केला. त्याने सांगितले की, बायकोला कॅन्सर झाला आहे. घरातील सर्वांना कोरोना झाला आहे. मुलगीचे शिक्षण चालू असल्याने पैशाची आवश्यकता आहे. त्यांनी १ लाख रुपये बँकेतून काढले.

गणेश जगताप हा घरी येऊन त्याने एक महिन्यात परत देतो, असे सांगून १ लाख रुपये घेऊन गेला. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये गणेश जगताप याने मुलीच्या शिक्षणासाठी व त्याच्या पत्नीवरील औषधोपचारासाठी पैसे मागितले.

त्याने खूप विनवणी केली. दागिने मागितले. सोने गहाण ठेवून पैसे घेतो व दोन महिन्यात सोने व पैसे परत देतो, असे सांगितल्याने त्यांनी लग्नातील त्यांच्याकडील ३० ग्रॅमचे मंगळसुत्र, १२ ग्रॅमचा नेकलेस, गंठण, कानातील टॉप्स असे ६ तोळ्याचे दागिने त्याला दिले.

त्यानंतर त्याने वेळोवेळी मुलीच्या शिक्षणासाठी पैसे मागून घेतले. २०२३ पर्यंत वारंवार तो पैसे मागून घेत होता. अशा प्रकारे २ लाख ५७ हजार रुपये व ६ तोळे वजनाचे दागिने असा ऐवज त्याने अद्यापपर्यंत परत केला नाही, म्हणून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

गणेश अशोक जगताप यांच्यावर ३ गुन्हे दाखल परंतु अद्यापही बडतर्फ का नाही?

१) मार्च २०२२ मध्ये राष्ट्रपती पदक मिळावे यासाठी पोलिस अभिलेखात २ लिपीकांना हाताशी धरून फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. २) ८ जुलै २०२५ रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात ४१८,४२० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.३) १७ जुलै २०२५ रोजी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात बीएनएस कायदा ३१६(२) ३१८ (२) ३५१ (२) ३,५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. असे गुन्हे दाखल असतानाही अद्यापही गणेश जगताप याला कोण पाठीशी घालतयं? याच्या मागचा आकार कोण? बडतर्फसाठी अजुन कशाची वाट पाहिली जातीये? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here