पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांच्या अवैध बांधकामावर पुणे महानगर पालिकेने हातोडा चालविला आहे.सर्वे नंबर ४३,४६,४८ मध्ये कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कलम ५३ (१) अन्वये नोटीस देवून नोटीस च्या अनुषंगाने कारवाई करणेत आली.कोंढवा खुर्द येथील स.नं. ४३ मधील माज शेख, अहमद शेख यांचे १०० चौ.मी.स.नं. ४६ मधील इरफान मोमीन यांचे २०० चौ.मी., इम्रान शेख यांचे १२०० चौ.मी.स.नं.४८ मधील
मुर्तजा शेख यांचे १८० चौ.मी., तौसिफ मौलाना यांचे २८८ चौ.मी.असे एकूण १९६८ चौ.मी. क्षेत्र मोकळे करणेत आले आहे.सदरची कारवाई ७ बिगारी सेवक व पोलीस बंदोबस्तासह २ गॅस कटर, ३ ब्रेकर व २ जेसिबी,२ गॅस कटर, यांचे सहाय्याने पूर्ण करण्यात आली आहे. असे पुणे महानगर पालिकेकडून कळविण्यात आले आहे.