पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी.
पुण्यातील कोंढवा भागात गेल्या ५ वर्षभरात बघता बघता शेकडो अवैधरित्या बांधकाम करून इमारती उभ्या राहिल्या आहेत. कोंढवा भकास करण्यात कुणा कुणाचा हात आहे हे कोंढवाकरांना देखील माहिती आहे. आज कोंढव्यात अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या इमारतींवर पालिकेने बुलडोझर चालविल्याने बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोंढवा बुद्रुक येथील ३ अनाधिकृत इमातींवर जॉ कटरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली आहे.आज ९ मार्च रोजी बांधकाम विकास विभाग झोन २, कोंढवा बुद्रुक येथील सर्व्हे नं. १ व ४ येथील अनाधिकृत इमातींवर जॉ कटरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. यावेळी ३ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. सुमारे १२ हजार ५०० स्के. फूट बांधकाम पाडण्यात आले.
सदर कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या पथकाने पार पाडली. यावेळी उप अभियंता शंकर दुदुसकर प्रवीण भावसार, विजय कुमावत, इमारत निरीक्षक निशिकांत छापेकर,धनंजय खोले, हेमंत कोळेकर, उमेश घाडगे, संदेश पाटील व रितेश शिंदे उपस्थित होते. यावेळी सुरक्षेसाठी अतिक्रमण पोलीस निरीक्षक अडागळे व कोंढवा पोलीस ठाण्याचे विजय बाबर व कर्मचारी उपस्थित होते. बांधकामावर कारवाई करताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पुढे अशीच कारवाई सुरू राहील अशी माहिती अधिकृत सुत्रांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.