मार्केटयार्ड आंबेडकरनगर परीसरात पिस्तुलाने गोळीबार करणा-या आरोपीस २४ तासात अटक; मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( 𝙋𝘾𝙏 𝙉𝙀𝙒𝙎) प्रतिनिधी

मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुरनं ६६ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, आर्म अॅक्ट ३ (२५) सह मपोका १३५ मधील आरोपी संतोष वामन कांबळे, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. आंबेडकरनगर, गल्ली नं.११, मार्केटयार्ड पुणे याने आंबेडकरनगर परीसरात पिस्तुलाने गोळीबार करुन फिर्यादी यास जिवे मारण्याचा प्रयत्न केले बाबत गुन्हा दाखल असुन पुढील तपास के. बी. डाबेराव, मार्केटयार्ड पोलिस ठाणे हे करीत आहेत.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विक्रांत देशमूख,पोलीस उपायुक्त परिमंडळ ५,पौर्णिमा तावरे सहायक पोलीस आयुक्त वानवडी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी मदन कांबळे, पोउपनि शिंदे, जाधव, मोधे, ढवाण, यादव, लोणकर, गायकवाड, झायटे यांनी बातमीदारामार्फत आरोपी संतोष वामन कांबळे, वय ३५ वर्षे, धंदा मजुरी, रा. आंबेडकरनगर, गल्ली नं.११, मार्केटयार्ड पुणे याचा शोध घेवुन त्यास २४ तासाच्या आत ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार,सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा यांचे सुचने नुसार पोलीस उप-आयुक्त,विक्रांत देशमुख, परिमंडळ ०५, सहायक पोलीस आयुक्त पौणिर्मा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील मदन कांबळे, शिंदे, जाधव, पोलीस नाईक मोधे, यादव,लोणकर, पोलीस अंमलदार गायकवाड, पोअं १०४६४ झायटे स्टाफ यांच्या पथकाने केली असून आरोपी संतोष वामन कांबळे, यास ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here