पुणे : खराडीमधील मनपा दवाखान्यात रुग्ण बरे होतात,पण अनधिकृत होर्डिंग्ज मात्र पुन्हा जिवंत होतात!

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स प्रतिनिधी 

भाग : २

पुणे : खराडी चौकातील पुणे महानगरपालिकेच्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केले जाते. मात्र, त्याच दवाखान्याच्या जागेत उभ्या असलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होऊनही ती पुन्हा उभी राहतात, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

यापूर्वी आकाशचिन्ह विभागाने कारवाई केलेले होर्डिंग्ज पुन्हा त्याच ठिकाणी ताठ मानेने उभे आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की, दवाखान्यातील कर्मचारी आणि आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी यांना हे होर्डिंग्ज दिसत नाहीत की पाहूनही दुर्लक्ष केले जात आहे? किंवा मलाई सगळे मिळून खात आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होते आहे.

मनपा दवाखान्याच्या जागेतील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याऐवजी तेच पुन्हा उभे राहत असेल, तर कारवाईचा नेमका उपयोग काय? नियमांचे पालन करणाऱ्यांसाठी एक न्याय आणि नियम मोडणाऱ्यांसाठी दुसरा न्याय आहे का? यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मागील बातमी }}} पुणे : खराडीत महानगरपालिकेच्या जागेत पुन्हा अनधिकृत होर्डिंग; कारवाईनंतरही ‘आशीर्वाद’ कुणाचा?

रुग्णांवर उपचार करणाऱ्या दवाखान्याच्या आवारातच अनधिकृत होर्डिंग्जचा “रोग” बळावत असेल, तर प्रशासनाच्या उपचारपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. आता या होर्डिंग्जवर खऱ्या अर्थाने उपचार होणार की पुन्हा फक्त कागदोपत्री कारवाई, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज तर लागले आहे परंतु त्यावर जाहिराती सुरू झाल्याने पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून यात सगळेच मलाई खात बसले आहेत. लवकरच याचा पुणे सिटीटाईम्स पर्दाफाश करणार आहे. क्रमशः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here