NGT न्यायालयाने नदी पात्रातील निळ्या व लाल पूररेषा मध्ये बांधकामावर कारवाईचे दिले होते आदेश.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहरातील म्हात्रे पुल राजाराम पूल दरम्यानच्या नदीकाठच्या हरित पट्ट्या मधील डीपी रस्त्यावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने कारवाई केली आहे.NGT न्यायालयाने नदी पात्रातील निळ्या व लाल पूररेषा मध्ये बांधकाम वर कारवाई करून १० तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. यावेळी विविध मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल इत्यादी वर कारवाई करण्यात आली.
यावेळी काही मिळकत धारकांनी स्वतः बांधकाम काढून घेतले.या कारवाईत सुमारे दीड लाख चौरस फुट विनापरवाना बांधकाम काढण्यात आले.एका मिळकत धारकाने निळ्या व लाल पूर रेषे मध्ये केलेला भराव सात जेसीबी लावून काढून घेण्यात आला. यावेळी सहा डंपर चे मदतीने सुमारे ६ हजार घन फुट भराव काढून वाघोली प्लांट येथे पाठविण्यात आला.
या कारवाईत ७ जेसीबी ४ गॅस कटर, ३ ब्रेकर, ५० कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.सदर कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम ,उप अभियंता श्रीकांत गायकवाड , कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते , शाखा अभियंता राहुल रसाळे,शाखा अभियंता भावना जड़कर,समीर गडइ , ईश्वर ढमाले, सागर शिंदे कनिष्ट अभियंता यांनी पूर्ण केली.
एकूण १५ मिळकतीवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये सृष्टी गार्डन , कृष्णसुंदर लॉन्स , नारायणी लॉन्स,श्री वनारसे , मजेन्टा लॉन्स , केशवबाग पंडित फार्म या मिळकतदार व व्यावसायीक यांचा सह बहुतांश मिळकत धारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेतली.