" पुणे सिटी टाईम्स इंपॅक्ट "
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
विना परवाना चारचाकी गाडयांवर अंबर दिवा बिनदिक्कतपणे वापरला जात असताना देखील आरटीओ व वाहतूक पोलिस अनभिज्ञ असल्याचा ढोंग करत असल्याने सोशल मीडियावर अंबर दिवा लावून व्हिडिओ व्हायरल होत असल्याने समाजिक कार्यकर्ते आदिल शेख यांनी तक्रार केल्याने पुणे सिटी टाईम्सने पुणे शहरात विना परवाना चारचाकी गाडयांवर वापरला जातोय अंबर दिवा. मोठ्या बापाच्या मुलांवर कारवाई होणार का? या सदराखाली दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती.
मागील बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. }}} विना परवाना चारचाकी गाडयांवर वापरला जोतोय अंबर दिवा. मोठ्या बापाची मुलांवर कारवाईची मागणी. व्हिडिओ
त्या बातमीची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड विभागाने दखल घेत विना परवाना चारचाकी खाजगी गाडयांवर अंबर दिवा अथवा कोणताही दिवा लावल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड राजश्री गुंड यांनी सर्व भरारी पथकांना काढले आहेत.
परंतु पुणे शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला काही देणे घेणे नसून कुंभकर्णाची झोप घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पहिल्या सारखे दमदार अधिकारी नसल्यानेच प्रत्येक गोष्टीत कारवाई करण्यास कुचराई करत असल्याचा आरोप पुणेकर करित आहेत. तर पुणे शहर आरटीओची बेफिकीरवृत्ती बाबतीत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.