पुणे : पैगंबर जयंतीत टिपू सुलतानचे बॅनर झळकावल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, परंतु शासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे काय?

0
Spread the love

पोलिस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात विचारला.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

मागच्या वर्षी बारामती एका सामाजिक कार्यकर्त्याला भारतीय वीर स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त जयंती साजरी करण्यास अटकाव करण्यात आला होता. त्याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते फैय्याज इलाहि शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्या याचिका सुनावणी दरम्यान न्यायालयाने पोलिसांना फटकारले होते. तर टिपू सुलतान जयंती साजरी करणे अन् बॅनर लावणं गुन्हा असेल तर तसं प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. ऐन जयंतीच्या वेळी सदरील सुनावणी घेण्यात आल्याने सगळ्यांचे लक्ष सुनावणीकडे टिकून राहिले होते. शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल करत बॅनर लावण्याची व टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास काहीच हरकत नाही.असे नमूद केले होते. तर न्यायालयाने टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास व बॅनर लावण्यास तात्काळ परवानगी देण्याचे आदेश पारित केले.

परंतु आजही पुणे शहरातील पोलिस प्रशासन युवकांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला जात आहे. परवा झालेल्या मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त येरवड्यात मोईन शेख नावाच्या तरूणाने हातात स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान यांचे बॅनर घेऊन नाचत होता. त्या विरोधात काहींनी तक्रार केल्या अन् त्याच्या विरोधात येरवडा शास्त्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर पोलिस प्रशासन एवढ्यावरच न थांबता त्याच्या हातात बेड्या घालून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात एडवोकेट महेश तुपे यांनी शेख याची बाजू मांडली अन् सांगितले की, टिपू सुलतान हे एका धर्मासाठी नाही तर भारताचे पहिले मिसाईल मॅन व स्वातंत्र्यसेनानी आहेत. यापूर्वीही कुरळप गावात टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात न्यायालयात दाद मागितल्याने न्यायालयाने तो गुन्हा रद्द केला. परंतु येरवडा पोलिसांनी कोणतीही खातरजमा व चौकशी न करता एका गटाच्या दबावाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर न्यायालयाने मोईन शेख याला जामीन मंजूर केला आहे.

असे प्रकार वारंवार घडत आहेत यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती. की, १) भारतीय वीर स्वतंत्र सेनानी ( freedom fighter) टिपू सुलतान यांचा उदोउदो उदातीकरण, जयजयकार केल्यनंतर कोणत्या कायद्यानुसार अथवा कलमानुसार गुन्हा दाखत केला जातो त्याची प्रत मिळावी.२) तसेच वीर स्वतंत्र सेनानी टिपू सुल्तान यांचे उदोउदो, उदात्तीकरण व जयजयकार करणान्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. असे परिपत्रक, अध्यादेश किंवा कायदा असल्यास त्याची माहिती प्रत मिळावी.३) तसेच वीर स्वतंत्र सेनानी टिपू सुलतान यांचे बॅनर वर फोटो किंवा जयंतीच्या दिवशी रॅली काढणे हे गुन्हा असल्यास ल्या कायद्याच्या प्रत, आदेश, अध्यादेशाची प्रत मिळावी.४) वीर स्वतंत्र सेमानी टिपू सुलतान याचं उदोउदो, उदात्तीकरण, जयजयकार केल्याप्रकरणी संपर्ण महाराष्ट्रात दाखल असलेल्या गुन्हयांची प्रत मिळावी. अशी माहिती मागितली असता अशी कोणत्याही प्रकारची माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही. त्यामुळे सदरची माहिती आपणास उपलब्ध करून देता येत नाही. असे उत्तर पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई यांनी दिलेले आहेत. मग पोलिस प्रशासन असे गुन्हे दाखल करून काय साध्य करत आहे. यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहे. अजहर अहमद खान ( सामाजिक कार्यकर्ते)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here