पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी बदल्यांचा धडाका लावल्याने पोलिस देखील धास्तावले आहे. वारंवार बदल्या होत असल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील २ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या व १ पोलिस निरीक्षकाची आज रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत.
१) सुरेश तुकाराम शिंदे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,समर्थ पोलिस ठाऐ ते वाहतूक शाखा. २). सुरज बंडू बंडगर पोलिस निरीक्षक,नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे.३) सुनिता लक्ष्मण रोकडे पोलिस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलिस ठाणे असे बदल्या केलेल्या पोलिसांची नावे आहेत.