बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणारा सतिश बन्सिलाल भाटी
जेरबंद,

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,

औषध उपचारासाठी ३० हजार रुपये १५ टक्के व्याजदराने देऊन त्रास देणाऱ्या खाजगी सावकाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या संदर्भात एकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा भाऊ यास मे २०२० या महिन्यात अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यास औषधोपचारासाठी पैशाची आवश्यकता असल्याने ते सतिश बन्सिलाल भाटी याचेकडे गेले होते.

त्यावेळी त्याने फिर्यादी यांना दरमहा दर शेकडा १५ टक्के व्याज दराने रक्कम रुपये ३० हजार व्याजाने दिले होते. त्यावेळी त्यांची ॲक्टिवा
एमएच/१२/एसडब्ल्यु/७२२३ ही स्वतःकडे गहाण ठेवुन घेतली व गाडीचे मुळ कागदपत्र व दोन कोरे चेक सिक्युरिटी म्हणुन ठेवुन घेतले होते.

फिर्यादी यांनी १५ टक्के व्याजासह सर्व पैसे परत दिले होते त्यानंतर आरोपीने त्याचे साथीदारासह फिर्यादीचे घरात शिरुन त्यांना आणखी २२ महिन्याचे व्याज व मुळ रक्कम सर्व मिळुन १ लाख २९ हजार परत
कर नाहीतर तुला व तुझ्या कुंटुबातील लोकांना मारुन टाकीन अशी धमकी देवुन फिर्यादी त्यांची पत्नी व आईस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली होती.

फिर्यादी यांचे बँक खात्यात सातव्या वेतन आयोगाचे जमा झालेले पैसे होते. त्याच दिवशी आरोपी सतिशकुमार भाटी याने फिर्यादी यांचेकडुन सिक्युरिटी म्हणुन घेतलेला चेकचा गैरवापर करुन बँकेत सादर करुन फिर्यादी यांचे संमती शिवाय स्वताःचे नावाने १९ हजार जबरदस्तीने काढुन घेवुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.

सतिश भाटी याचेकडे सावकारीचा परवाना नसताना तो व्यवसाय करत असल्याने त्याचविरुध्द खडक पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ४२०, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ व सावकारी अधिनियम सन २०१४ कलम ३९, ४५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


युनिट-१ गुन्हे पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपी सतिश बन्सिलाल भाटी वय-५४ रा-मेमजादे बिल्डिंग, प्लॅट नं १ पहिला मजला हरका नगर भवानी पेठ याचा शोध घेवुन त्यास रोजी ताब्यात घेतले असता, स्नेहा जोशी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर,

व सहायक सह अधिकारी एच. ए. पाटील व राजन वनशिव यांचेसह आरोपीचे दुकानाची व घराची पाहणी केली तेव्हा त्याचे दुकानामध्ये वेगवेगळया बँकेचे एकुण ६४ चेक त्यावर खातेदार यांची सही असलेली वेगवेगळया बँकेचे एकुण १६ पासबुक, पाचशे रुपये दराचे तीन व शंभर रुपये दराचे नऊ असे एकुण १२ नॉन ज्युडिशियल स्टॅम्पपेपर, रजिस्टर व इतर कागदपत्र मिळुन आली आहेत. एक मोबाईल फोन असा दहा रुपयाचा ऐवज पोलीसांनी तपासकामी जप्त करुन ताब्यात घेतलेला आहे.

आरोपीकडे मोठया प्रमाणात चेक, पासबुक, स्टॅम्पपेपर मिळुन आले आहे त्याने आणखी कोणाला व्याजाने पैसे दिले आहेत. त्याचे इतर साथीदार कोण आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत. प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास २७ तारखे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

अशाप्रकारे आरोपीने अनेक नागरिकांना व्याजाने पैसे दिले आहेत त्या नागरिकांनी गुन्हे शाखा युनिट १ पुणे शहर येथे संपर्क साधावा तसेच बेकायदेशीर व्याजाने पैसे देणारे सावकार यांचेविरुध्द तक्रार देण्यासाठी नागरिकांनी पुणे यावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, अजय जाधव पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर शशिकांत दरेकर
दत्ता सोनवणे,अभिनव लडकत, महिला पोलीस अंमलदार रुखक्साना नदाफ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here