पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ७० वी कारवाई.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सराईत गुन्हेगाराला एम.पी.डी.ए कायद्यानुसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. युसुफ उर्फ आतुल फिरोज खान, वय-२४ वर्षे,रा.५४/डी.पी.घर नं. २२२, मोठी अंजुमन शेजारी, लोहीयानगर, याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अतुल हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.त्याने त्याचे साथीदारांसह खडक पोलीस ठाणे हद्दीमध्ये लोखंडी कोयता, तलवार,लाकडी दांडका या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी,बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.मागील ५ वर्षामध्ये त्याचेविरूध्द ५ दाखल आहेत.
त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायदयान्वये औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह,येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.
नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये श्रीहरी बहिरट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे, श्रीमती वैशाली चांदगुडे, वरिष्ठ
पोलीस निरीक्षक,पी.सी. बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली आहे.