पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी,
बारामती येथील गोपीनाथ पडळकर यांनी निवडणूकीचे वेळी प्रतिज्ञापत्रद्वारे खोटी माहिती दिल्याप्रकरणी बारामती न्यायालयाने पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी २००९ ,२०१४,२०१९ साली निवडणुकी कामी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते मात्र या प्रतिज्ञापत्रात शेत जमीन ,बिगर शेतजमीन ,निवासी इमारती ,वाहन खरेदीच्या किंमतीत मोठा तफावत आढल्याने सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे ,डॉ अभिषेक हरिदास यांनी जेष्ठ वकील ऍड. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बारामती यांचे कोर्टात (CRI.M. A /380/2021) हे प्रकरण दाखल केले होते .
न्या.ए. जे.गिरे यांच्या कोर्टात सुनावणी नंतर प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने न्यायालयाने बारामती पोलीसांना तपास करून अहवाल सादर करायचे आदेश दिले आहेत .अशी माहिती एॅड समीर शेख यांनी दिली आहे.
“प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे ही लोकशाही साठी गंभीर बाब असून लोकशाही धोक्यात आणणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात आम्ही कोर्टात केसेस दाखल करणार आहोत.
जेष्ठ.ऍड. समीर शेख”
“एकच प्रॉपर्टी खरेदी किमती दरवेळी वेगवेगळ्या कश्या आता हे पोलिसच तपासतील.
डॉ अभिषेक हरिदास(याचिकाकर्ता)”
“या बाबतीतील पुरावे आम्ही पोलिसांना देणार.
अनिल भांगरे (याचिकाकर्ता)