पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
इनलॅक्स अँड बुधरानी दवाखान्याच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हिरालाल सारवान वय ७० वर्षे राहणार दौंड जिल्हा पुणे यांच्या पोटावर व गुप्तांगावर गंभीर ईजा झाल्याने दवाखान्याच्या व्यवस्थापक मंडळावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ०६/२३ गु.र.न. ने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्ण हिरालाल सारवान हे रेल्वे कर्मचारी असून सन २०१२. साली सेवानिवृत्त झालेले होते.त्यानंतर ते दररोज व्यायाम करण्यासाठी घरापासून रेल्वे स्टेशन पर्यंत चालत ये – जा करायचे. नेहमीप्रमाणे सायंकाळी व्यायाम करून चालत येत असताना अचानकपणे त्यांना दुचाकी स्वाराने धडक दिल्याने, त्यांच्या डोक्याला इजा झाली व त्यानंतर त्यांना इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केले होते.
५ जानेवारी रोजी त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली व त्यानंतर त्यांचा मुलगा अॅड सुरेश सारवान यांना सांगितले की ऑपरेशन, शस्त्रक्रिया उत्कृष्टरित्या झाली आहे. परंतु तुम्ही पेशंटला आत्ता भेटू शकत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वडिलांना रुग्णास भेटले त्यावेळेस त्यांना बघून धक्काच बसला, कारण त्यांच्या पोटावरती गंभीर स्वरूपाच्या इजा झाली होती पोटावर आणि गुप्तांगावर भाजल्याची किंवा जळाल्याचे सारखे वाटले त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना विचारले असता, डॉक्टरांनी उडवा उडवी उत्तर देऊन घडलेला प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला.
घडलेला प्रकार समजतात सर्व वकील बांधव मोठ्या प्रमाणात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आले व पोलीस अधिकाऱ्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जाऊन घडलेला प्रकारची शहानिशा करून परत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात येऊन रुग्णाचा मुलगा अॅड सुरेश सर्वान यांच्या नावाने फिर्याद देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अॅड तोसिफ शेख,अॅड क्रांती सहाने, अॅड स्वप्नील गिरमे,अॅड दीपक गायकवाड, अॅड महेश गवळी,अॅड जयदीप डोके पाटील,अॅड मोहम्मद शेख, अॅड शिवानी गायकवाड, अॅड विश्वजीत पाटील उपस्थित होते तसेच आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष आय टी भाई शेख, आझाद समाज पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष स्वातीताई गायकवाड देखील उपस्थित होते.