पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी,
लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फॅशन स्ट्रीट जवळ ए. बी. सी. फार्म दुकाना समोर कॅम्प येथे एका व्यापा-यास जीवे ठार मारण्याच्या
उद्देशाने त्याचेवर काल गोळीबार झाला होता. या घटनेत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना ससुन हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-२ कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असताना त्यांचे बातमीदारा कडुन मिळालेल्या बातमी वरुन गुन्हयातील आरोपी नईम ऊर्फ शानु सलीम शेख वय-३८,वर्षे धंदा- व्यवसाय रा. भिमपुरा गल्ली नं १५ घरनं १५२३ कॅम्प पुणे यास लुल्लानगर ब्रिज खाली शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे.
(१) जुल्फिकार बशीर कुरेशी ऊर्फ शेख वय ४३ रा. चुडामन तालीम, भवानी पेठ, (२) तबरेज कुरेशी रा. कुरेशी मस्जिद जवळ कॅम्प, (३) नईम ऊर्फ शानु सलीम शेख यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाही कामी लष्कर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तरी गंभीर गुन्हयातील आरोपीस गुन्हा दाखल झाले पासुन ७ तासात जेरबंद करुन उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक,पोलीस उप आयुक्त, (आर्थिक व सायबर), भागश्री नवटक्के, अतिरिक्त कार्यभार,अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे सहा.पो. आयुक्त गुन्हे,
गजानन टोम्पे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखा, युनिट-२, विशाल मोहिते, राजेंद्र पाटोळे पोलिस अंमलदार मोहसीन शेख, निखिल जाधव, उत्तम तारु शंकर नेवसे,विनोद चव्हाण,प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे, समीर पटेल या पथकाने केलेली आहे.