कोंढवा मधील अवैध बांधकामांवर तातडीने कारवाई करा, माजी स्थायी समिती अध्यक्षाची मागणी.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी.

कोंढवा बकाल करणाऱ्यांवर आता कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. बघता बघता कोंढवा मधील अवैध बांधकामांच्या इमारती आठ दहा मजली उभी राहत असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात घालून, घरे विकली जात आहे.

ही एक प्रकारे नागरिकांची फसवणूकच केली जात आहे. कोंढवा मधील साईबाबा नगर, मिठानगर, भाग्योदय नगर, कुबा मस्जिद जवळ, शिवनेरी नगर,पारगे नगर व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू असल्याचे दिसू लागले असतानाही पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळयात अंजन कमी पडले आहे?

सर्व सामान्य नागरिकांना अवैध बांधकामे दिसत असताना देखील पुणे महानगर पालिकेतील अधिकारी काळा चष्मा घालून अंधळयाचा सोंग घेत आहेत.

एखाद्या वेळी भूकंपाचा छोटासा झटका लागला तर, पत्त्याच्या इमारती प्रमाणे इमारती झटकन पडून जाईल.

असे बांधकामे करण्यात येत आहे. अवैध बांधकामांमुळे कोंढव्यात आज वाहतूक, वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज ची अवस्था अगदीच बिकट झाली आहे. कोणत्याही प्रकारची शासकीय फि न भरता एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम करणे हे अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच होऊ शकते?

 

पुणे महानगर पालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस रशीद सुंडके यांनी अवैध बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here