कोंढवा भागातील घर मालक,सोसायटी चेअरमन,सेक्रेटरी तसेच नागरिकांना पोलिसांचे आवाहन
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
कोंढवा भागातील भाडेकरूंना भाडे करार बंधनकारक करण्यात आले असून पडताळणी केल्याशिवाय घर भाडयाने दिल्यास कोंढवा पोलिसांनी कारवाईचा ईशारा दिला आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी १८ जूलै २०२३ रोजी आदेश जारी केले आहे.
आदेशान्वये पुणे शहरातील राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्याकडे राहत असलेल्या भाडेकरूंची संपूर्ण माहिती, मूळपत्ता, पूर्वी राहत असलेला पत्ता,भाडेकरू संदर्भातील संपूर्ण माहिती जवळील पोलीस ठाणे येथे घरमालकाने देणे बंधनकारक आहे. प्रत्येक घर मालकाने भाडेकरू ची माहिती पोलीस ठाण्यात वेळेत सादर न केल्यास घर मालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांनी भाडेकरुचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये प्रवेश दिल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच ते सर्वस्व जबाबदार राहतील.
ऑनलाईनद्वारे भाडेकरुचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस ठाण्यात घर मालकाने देणे हे बंधनकारक असेल कोणी हेवी डिपॉझिट मागत असेल तर आपण पोलीसांना कळवावे . त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा संतोष सोनवणे यांनी कळविले आहे.