पुण्यातील नाना पेठेतील तंबाखू विक्रेत्यांकडून ४ लाख हिसकावून गोळीबार; स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण. स्वारगेट परिसरातील घटना

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहरातील गजबजलेल्या स्वारगेट परिसरातील डायमंड हॉटेल जवळ काल रात्री दहाच्या दरम्यान गोळीबार करण्यात आला होता. गोळीबार झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. तर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. हकीकत अशी की, स्वारगेट परिसरातील डायमंड हॉटेल जवळून जाणाऱ्या व्यावसायिकावर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार करुन जखमी केले. त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली.

ही घटना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गणेश कला क्रीडा मंचजवळील डायमंड हॉटेलसमोरील रोडवर घडली. सदरील गोळीबारात लतेश हसमुखलाल सुरतवाला वय ५१ , रा . माणिकबाग हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत आणि मांडीत गोळी घुसली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतेश सुरतवाला यांचा नाना पेठेत तंबाखुचा व्यवसाय आहे. बुधवारी ते आपल्या नोकराला घेऊन दुचाकीवरुन घरी जात होते.त्यांच्याजवळ ४ लाख रुपये असलेली बॅग होती.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले.

पाऊस असल्याने सीसीटीव्हीचे चित्रण धुरकट आले असल्याने पोलिसांच्या तपासात तो एक मोठा अडथळा ठरला आहे.गोळीबार करणारे आरोपी अद्यापही पोलिसांना मिळून आलेले नाही. तर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here