पुणे सिटी टाईम्स (PCT NEWS) प्रतिनिधी
लोन देण्याच्या नावाखाली एकाची लाखोंची फसवणूक केली गेली, त्या फसवणुकी संदर्भात सायबर पोलिसांकडे दाद मागितली असता सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद न करून घेतल्याने पुण्यातील लष्कर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हकीकत अशी की, मुस्ताक गुलाम हुसैन यांना १ लाख ५० हजार रुपयाचे लोन देण्याचे अमिष दाखवुन विपिन गुप्ता, प्रविण कुमारनाथ,अमर सिंह,रा. दिल्ली यांनी फिर्यादीची फसवणुक करुन विश्वासघात केला तसेच लोन देतो म्हणून फिर्यादीकडुन वेळोवेळी गुगल पे द्वारे १ लाख ४ हजार रुपये हडप केले.
२७ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी यांनी India bull Dhani या वेबसाईट वरती लोन अप्लाय केला होता.आरोपींनी फिर्यादीला खोटे Sanction लेटर पाठवुन उलट फिर्यादी कडुनच वेगवेगळे बहाने करुन पैसे उकळले.
फिर्यादी यांनी धनी कस्टमर केअर येथे फोन केले असता त्यांनी फिर्यादीला सांगितले की,आम्ही कोणालाही लोन देत नाही, तुमची फसवणुक झालेली आहे.तुम्ही सायबर डिपार्टमेंटकडे जाऊन तक्रार दाखल करा.
फसवणूक करणारे परत वारंवार फिर्यादीला मॅसेज व फोन करुन पैसांची मागणी करीत होते. फिर्यादी यांना फसवणुक झाल्याची जाणीव झाल्याने फिर्यादी यांनी अॅड. साजिद ब. शाह, अॅड. अमित मोरे, अॅड. हबीब खान यांचा मार्फत हडपसर पोलीस ठाणे व सायबर सेल पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणुन फिर्यादी यांनी अॅड. साजिद ब.शाह मार्फत लष्कर न्यायालयात १५६(३) प्रमाणे खाजगी तक्रार दाखल केली होती.
न्यायालयाने युक्तीवाद एकुण आरोपीं विरोधात हडपसर पोलिसांना भा.दं.वि. कलम ४१९,४२०, ४०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.फिर्यादी तर्फे अॅड. साजिद ब. शाह, अॅड. अमित मोरे, अॅड. हबीब खान हे काम पाहत आहेत. अशी माहिती शहा यांनी पुणे सिटी टाईम्सला दिली आहे.