मंडल अधिकारी,तलाठ्यांकडून दैनंदिन डायरी वरिष्ठांकडे सादर करण्यास टाळाटाळ; अधिकारी मात्र हतबल

0
Spread the love

तहसिलदार यांच्या आदेशालाच वारंवार का दाखवले जाते केराची टोपली.

दैनंदिन डायरी न देण्यामागे कारण काय?

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला, पत्राला कशी केराची टोपली दाखवायची यात मंडल अधिकारी व तलाठी माहिर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम १९६६ मधील खंड ४ मधील प्रकरण २, मंडल अधिकारी व तलाठ्यांनी कर्तव्यनुसार दैनंदिन अद्यावत करून कार्यालय प्रमुखाच्या समक्ष सादर करणे आवश्यक आहे.

” दैनंदिनी सादर करण्याचे तहसिलदारांचे पत्र “

परंतु मासिक दैनंदिन डायरी वरिष्ठांकडे सादर करणे बंधनकारक असताना तहसिल हवेली मधील मंडल अधिकारी व तलाठ्यांनी कित्येक वर्षांपासून दैनंदिन डायरी सादर केली नसल्याचे समोर आले आहे.

हवेली तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी २९ जून रोजी कार्यालयीन पत्र काढून मंडल अधिकारी, तलाठ्यांना २ दिवसांत मासिक दैनंदिनी सादर करण्याचे आदेश दिले होते.

परंतु मंडल अधिकारी व तलाठ्यांनी अद्यापही दैनंदिनी सादर न करता तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून आम्ही कोणालाही जुमानत नाही असे दाखवून दिले आहे.

तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या कार्यकाळात कारवाई होत नसून फक्त नोटीसा, पत्रव्यवहार होत असल्याने मंडल अधिकारी, तलाठ्यांची हिम्मत वाढली आहे.यात शंकाच नाही?

कोलते पाटील यांनी कडक निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले पाहिजे, तरच त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईल, मंडल अधिकारी व तलाठी का बरं दैनंदिनी सादर करत नसतील? का त्यात काही दडलंय? याचे लवकरच पितळ उघडे पुणे सिटी टाईम्स पाडणार आहे. तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

“तहसिलदारांना दैनंदिनी डायरी बाबतीत कशी आली जाग”

हडपसर मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुलला व कात्रज तलाठी अर्चना वनवे फुंदे यांची दैनंदिनी डायरीची प्रत अजहर खान यांनी मागितली होती. ती माहिती दिली नसल्याने खान यांनी प्रथम अपिल दाखल केले होते त्यावेळी तहसिलदारांचया निर्दशनास आणून दिल्यानंतर तहसिलदारांनी मंडल अधिकारी, तलाठ्यांना पत्र काढून मासिक दैनंदिनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हडपसर मंडल अधिकारी,कात्रज तलाठी अर्चना वनवे फुंदे यांची बाबतीत कार्यालयात चर्चाच चर्चा,

हडपसर मंडल अधिकारी व्यंकटेश चिरमुलला व अर्चना वनवे यांच्या विरोधात अनेक तक्रारी असतानाही त्यांना तहसिल कार्यालयातून अभय दिला जात असल्याची चर्चा सध्या तहसील हवेली कार्यालयातून ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here