पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती ही ५ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे परंतु गेल्या ३ वर्षांपासून गणपती विसर्जन व पैगंबर जयंती सोबत येत असल्याने मुस्लिम समाजाकडून दोन तीन दिवस पुढे मिरवणूक ढकलली जात आहे.
या वर्षीही पैगंबर जयंती मुस्लिम समाजाकडून ८ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होणार आहे. सदरील बैठक आज पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यात पोलिस आयुक्तांनी सांगितले की सदरील मिरवणूक ही ८ तारखेला काढली जाईल आणि सिरीत कमीटी ही सकाळी ९ वाजता मिरवणूकीला सुरूवात करेल.
तर येणाऱ्या मिरवणूकींना रात्री १० वाजेपर्यंत स्पीकर परवानगी असणार आहे. आणि विशेष म्हणजे मिरवणूकीतील रस्त्यावर असणाऱ्या दारू विक्री बंद ठेवण्यात येईल याचे आश्र्वासन देखील पोलिस आयुक्तांनी दिले आहे.




