मार्केटयार्ड गंगाधाम येथील हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाकडून धडक कारवाई.

0
Spread the love

 

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

मार्केटयार्ड गंगाधाम येथील हिल टॉप हिल स्लोप येथील अनधिकृत इमारतीवर महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. आज बुधवार ७ फेब्रुवारी २०२४ रोजी कारवाई केली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट, दोन पोलीस गट यांच्या साहाय्याने २९ अनधिकृत आस्थापना पाडण्यात आल्या. तसेच आई माता मंदिरा ते शत्रुंजय मंदिर रस्त्यावर पूर्व बाजू कडील बिबवेवाडी पोलीस चौकीच्या हद्दीतील भागात ही कारवाई करण्यात आली आहे

पालिकेची परवानगी न घेता बिबवेवाडीतील घाटमाथ्यावर अनेक व्यावसायिकांनी गोडाऊन, दुकाने, शोरूम आदींची अनधिकृत बांधकामे केली आहेत. संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाने वारंवार नोटिसा दिलेल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे प्रशासनाने परिसरात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

बिबवेवाडी येथील डोंगरमाथा परिसरात अनेक पक्की बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच पत्राशेड, गोडाऊन उभारलेले आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

तसेच कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, ट्युलिप इंजिनीयर प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने या पथकाने सदर कारवाई योग्यरित्या पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here