कोंढव्यातील हजरत अबू हनीफा हॉल चालवण्यासाठी दिलेल्या फ्यूचर फाऊंडेशनने पुणे मनपा सोबत केलेल्या करारातील सर्वच नियम बसविले धाब्यावर.! उद्यापासून होणार आदोंलन

0
Spread the love

ज्या नागरिकांची फसवणूक केली आहे त्यांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे इनकेडिबल सोशल वर्कर ग्रुपचे आव्हान.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे कोंढव्यातील साईबाबा नगर सर्वे नंबर ४६ मध्ये नागरिकांच्या सोईसुविधा साठी हजरत अबू हनीफा बहुउद्देशीय हॉल पुणे महानगर पालिकेने बांधले होते. पुणे महानगर पालिकेचा हेतु हा फक्त स्थानिक लोकांना याचा फायदा व्हावा? परंतु त्या हॉल साठी अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पुणे महानगर पालिकेने फ्यूचर फाऊंडेशन या संस्थे सोबत करार केला असून त्याची मुदत १जून २०२३ ते ३१ मे २०२८ पर्यंत आहे.

परंतु सदरील फ्यूचर फाऊंडेशन संस्था मनमानी कारभार करत असल्याची तक्रार वाढत असताना देखील पुणे महानगर पालिकेतील अधिकारी ढिम्मच बसलेले आहेत. तर करारातील नियमानुसार वेळोवेळी तपासणीचा अधिकार महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना असताना देखील अधिकारी तपासणी करत नसल्याचा देखील आरोप केला जात आहे.फ्यूचर फाऊंडेशन ने महानगर पालिका सोबत केलेल्या करारात सुस्पष्ट लिहलेले आहे की, मनपाने ठरवून दिलेलेच कार्यक्रम पार पाडावे. परंतु सदरील संस्थेकडून लग्न समारंभासाठी मनमानी रूपये घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अशा अनेक तक्रारी पुणे महानगर पालिकेकडे प्राप्त झाले असतानाही पुणे महानगर पालिका झोपेचे सोंग घेत आहे किंवा यात मिळणारी मलाई अधिकारी चकत आहेत? असा आरोप समाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तर पुणे महानगरपालिकेने लग्न, साखरपुडा, रिसेप्शन, मुंज, यासारख्या कार्यक्रमांना बंदी घालून देखील कोंढव्यातील राजकीय नेत्यांच्या वरदहस्त असल्याने मनमानी रक्कम तथा ते सांगतील ते रक्कम मागणी केली जात आहे.

तर साहित्य, भांडी आपल्याकडूनच घ्यावे लागतील असा सजजड दम नागरिकांना दिला जात आहे. फ्यूचर फाऊंडेशन कडून नियमबाह्य कृती केली जात असून सदरील संस्थेचा करारनामा तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी इनकेडिबल सोशल वर्कर ग्रुपचे असलम बागवान हे उद्यापासून हॉल समोर आदोंलन करणार असल्याचे पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here