कोंढव्यातील बेकायदेशीरपणे चालू असलेल्या बांधकामांचे खरेदी खत करण्यात येऊ नये, पुणे जिल्हाधिकारी व नोंदणी महानिरीक्षकाकडे तक्रार दाखल.

0
Spread the love

बेकायदेशीर गुंठेवारीत पालिका व सब रजिस्ट्रार कार्यालयातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे?

बेकायदेशीर गुंठेवारीची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

कोंढवा खुर्द मध्ये बघता बघता शेकडो अनधिकृत बांधकामे झाली असून आजही बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम चालू आहे. पुणे सिटी टाईम्सने बेकायदेशीरपणे चालू असलेल्या बांधकामांचा पाठपुरावा केला असता, तक्रारीचा पाऊस सुरू झाला. त्यातूनच बोगस गुंठेवारीची माहिती समोर आली आहे.

सन २०१८ साली ते आजतागायत बेकायदेशीर बांधकामांची माहिती घेतली असता, बोगस कागदपत्रे तयार करून पुणे महानगर पालिका व सब रजिस्ट्रार कार्यालयाची फसवणूक केल्याचे काही पुरव्यातून दिसून आले आहे.

सध्या काम चालू असलेल्या बांधकामांचे खरेदी खत तब्बल २२ वर्ष जुने दाखवून सन २००२ ची खरेदी खत तयार केल्याची माहिती हाती आली आहे. संपूर्ण कोंढव्यात सध्या पुणे महानगर पालिकेने परवानगी दिलेली नाही. तर याचा व राजकीय लोकांचा फायदा घेत नागरिकांची फसवणूक करून बक्कळ माया जमवली आहे. सध्या कोंढव्यात ठिक ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

१) आंबेडकर नगर, माने हॉस्पिटल समोर (उजेर बिल्डर) कोंढवा खुर्द. २) सर्वे नं ४२ मदिना टॉवर , हसनैन मस्जिद जवळ कोंढवा खुर्द,कातील बिल्डर व इतराचे‌ काम चालू आहे. ३) सर्वे नं ४९ मिठानगर कोंढवा खुर्द.४) भाग्योदय नगर गल्ली नं ४ विनर पॅलेस शेजारी,कोंढवा खुर्द. ५) सर्वे नं ४ काकडे वस्ती पठाण चौक, महावीर स्वामी चौक, कोंढवा खुर्द येथे माने बिल्डरचा काम चालू आहे.

६ ) मिठानगर राजीव गांधी इंग्लिश प्रायमरी स्कूल शेजारी, कोंढवा खुर्द. ७) मिठानगर अलफलाह मस्जिद जवळ हाजरा बिल्डर, कोंढवा खुर्द.८ ) भाग्योदय नगर गल्ली नं १८, फाइव स्टार बेकरी शेजारी इक्बाल बिल्डर,‌कोंढवा खुर्द.९) शिवनेरी गल्ली नं २, आसिफ इनामदार बिल्डर. कोंढवा खुर्द.असे बेकायदेशीरपणे चालू असलेले बांधकाम दिसून आले आहे.

हेच बांधकामातील फ्लॅट नागरिकांना विकून बक्कळ माया कमवून नागरिकांचे बोगस २००२ सालीचे खरेदी खत तयार करून फसवणूक केली जाणार असल्याने पुणे सिटी टाईम्सने पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा नोंदणी महानिरीक्षकाकडे लेखी तक्रार करून वरील बेकायदेशीर बांधकामाचे खरेदी खत न करण्याची तक्रार दाखल केली आहे. क्रमशः

 

नागरिकांनो कोंढव्यात फ्लॅट घेताय मग जरा थांबा?

कोंढवा खुर्द, मिठानगर, भाग्योदय नगर, सवेरा पार्क, काकडे वस्ती, आंबेडकर नगर, साईबाबा नगर, शिवनेरी नगर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरे ( फ्लॅट) विकण्यात आली आहे. परंतु बोगस गुंठेवारीची कागदपत्रे तयार करून नागरिकांची फसवणूक करून घरे विकण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेकडे माहिती घेतली असता पुणे महानगर पालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी अथवा भोगावट पत्र, मंजूर प्लॅन देण्यात आलेले नाही. मग पुणे महानगर पालिकेने कोणतीच परवानगी दिली नसल्याने दस्त नोंदणी ( खरेदी खत) करताना भोगावट पत्र,मंजूर प्लॅन कसे जोडण्यात आले आहे.‌ म्हणून नागरिकांनी घरे घेताना आपली फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here