शेकडो अनधिकृत बांधकामे होत असताना पालिका ॲक्शन मोडवर कधी येणार?
अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची तक्रार “महारेरा” कडे दाखल.
कोंढवा पोलिसांची कारवाईस कुचराई? गुन्हे दाखल होणार का?
पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.
कोंढवा खुर्द मध्ये जागोजागी बेकायदेशीरपणे बांधकामांची ईमले तयार होत असताना पालिकेचं आणि कोंढवा पोलिसांचे सुस्पष्ट दुर्लक्ष होताना दिसत आहे.सध्यातरी कोंढवा पुर्णपणे बकाल झाला आहे. कोंढव्यात गटार,पाणी, रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. तर वाहतूक कोंडीत जीव गुदमरतोय,तरी सुद्धा बेकायदेशीरपणे बांधकाम करणाऱ्यांवर कुणाचाच वचक राहिलेला नाही.
पुणे महानगर पालिका बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यात एमआरटीपी ऍक्ट प्रमाणे गेल्यास पोलिस टाळाटाळ करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आज बांधकाम करणाऱ्या धनाजींनी कोंढव्यात अनधिकृत बांधकामे करून बक्कळ पैसा कमावला आहे.
त्यातूनच ते पत्रकारांना व इतर सर्व सामान्य नागरिकांना धमकविणयाचे प्रकार करत आहे. पैसा बोलता है, म्हणत आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही या विचाराने बिल्डर धनाजी “भाईगिरींची” भाषा वापरताना दिसत आहे.
मध्यंतरी काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी बातम्या लावल्याने त्यांना धमकविणयाचा प्रकार समोर आला आहे. पुणे सिटी टाईम्सने आता कोंढव्यातील बिल्डर धनाजीरावांची कुंडलीच जमा केली आहे. पुणे सिटी टाईम्सच्या प्रतिनिधींनी कोढव्यात माहिती घेतली असता एका तासात १० बेकायदेशीरपणे बांधकाम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे.
१) आंबेडकर नगर, माने हॉस्पिटल समोर (उजेर बिल्डर) कोंढवा खुर्द. २) सर्वे नं ४२ मदिना टॉवर , हसनैन मस्जिद जवळ कोंढवा खुर्द,कातील बिल्डर व इतराचे काम चालू आहे. ३) मिठानगर कोंढवा खुर्द.
४) भाग्योदय नगर गल्ली नं ४ विनर पॅलेस शेजारी,कोंढवा खुर्द. ५) भाग्योदय नगर गल्ली नं ४ हाजरा हाईटस शेजारी.कोंढवा खुर्द. ६) सर्वे नं ४ काकडे वस्ती पठाण चौक, महावीर स्वामी चौक, कोंढवा खुर्द येथे माने बिल्डरचा काम चालू आहे.
७ ) मिठानगर राजीव गांधी इंग्लिश प्रायमरी स्कूल शेजारी, कोंढवा खुर्द. ८) मिठानगर अलफलाह मस्जिद जवळ हाजरा बिल्डर( माने बिल्डर) कोंढवा खुर्द.९ ) भाग्योदय नगर गल्ली नं १८, फाइव स्टार बेकरी शेजारी इक्बाल बिल्डर,कोंढवा खुर्द.१०) शिवनेरी गल्ली नं २, इनामदार बिल्डर. कोंढवा खुर्द.
असे एकुण १० बेकायदेशीरपणे चालू असलेले बांधकाम दिसून आले आहे. अधिक माहिती घेतली असता नागरिकांनी खरेदी केलेल्या फ्लॅटची कागदपत्रे बोगस बनवून, तसेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून नागरिकांची फसवणूक करत असल्याचे काही कागदपत्रांनुसार समोर आले आहे.
पुणे महानगर पालिकेने सदरील बांधकामावर तात्पुरते खड्डे न पाडता, सदरील बांधकामे जमीनदोस्त करावे. जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही. बेकायदेशीरपणे बांधकाम करणारे धनाजीराव विसरलेत की, ऐखादे बेकायदेशीर बांधकाम कोसळलेच तर मोठ्ठी जीव हानी होऊ शकते.
यापूर्वी कोंढव्यात असे दोन ते तीन प्रकार घडल्याचेही जाणकारांनी पुणे सिटी टाईम्सला सांगितले आहे.बोगस कागदपत्रे तयार करून कशी बनवावी केली जाते याचे पुरावे पुण्यातील डॅशिंग पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना देणार असून सदरील टोळींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. क्रमशः