चोरटा अवघे ५ तासात पोलीसांच्या जाळयात, खडक पोलीसांची कामगिरी.
पुणे सिटी टाईम्स ; प्रतिनिधी. मुलीच्या लग्नासाठी पै पै जमा करून घेतलेल्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. तर खडक पोलिसांनी गरागरा यंत्रणा फिरवून ५ तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. रविवारी १२ तारखेला फिर्यादी व्यंकटेश शिमाप्पा पल्ला वय ४० वर्षे रा. महात्मा फुलेवाडा शेजारी गंज पेठ पुणे, हे कुटुंबीयासह लग्नाचे अगोदर नवरी मुलीला घेवुन आपले कुलदैवत तुळजा भवानी माता तुळजापुर येथे घरास कुलूप लावुन गेले होते.
तर सोमवारी १३ डिसेंबर रोजी व्यंकटेश पल्ला यांचे घराचे शेजारी राहणारी महिलेचा त्यांना फोन आला तेव्हा तिने सांगितले की, तुमचे घराचा दरवाजा उघडा असुन सामान अस्ताव्यस्त पडलेले आहे. त्यानंतर दिनांक १४ डिसेंबरला पल्ला कुटुंब जेव्हा देवदर्शन करुन घरी आले,
तेव्हा घरामधील अस्ताव्यस्त पडलेले दिसले, त्यानंतर त्यांनी सर्वत्र पाहिले असता स्वंयपाक घरातील कडप्याखाली डब्यातील ६ तोळेचे दागिने व रोख
रकम ४ लाख १० हजार किंमतीचा माल चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने त्याबाबत खडक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाचे विरुध्द गुन्हा दाखल केला होता.
सदरचा गुन्हा तपास तपास पथकाचे (डी.बी) प्रभारी अधिकारी राहुल खंडाळे पोलीस उप निरीक्षक यांचेकडे देण्यात आला.सदरचा गुन्हा हा उघड करणे बाबत श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना तपास संदर्भात योग्य त्या सुचना देवुन मार्गदर्शन केले,त्याप्रमाणे तपास करीत असतांना गुन्हयाचे ठिकाणी आरोपीने असा कोणत्याही पुरावा ठेवला नव्हता,
झोपडपट्टी परिसर असल्यामुळे तपास कार्यात अडथळे येत होते, सी.सी. टी.कॅमेरे सुध्दा नव्हते आरोपीचा मार्ग काढण्यात अपयश येत होते.त्याचवेळी पोलीस अंमलदार संदिप तळेकर व रवी लोखंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरची चोरी ही रेकॉर्डवरील आरोपी आकाश भोरे सध्या रा.नवीन म्हाडा बिल्डींग रामटेकडी हडपसर मुळ रा.गंज पेठ, महात्मा फुलेवाडया जवळ याने केलेली आहे,व तो न्यु लाईफ इंग्लिश मिडीयम स्कुल, शंकरशेठ रोड पुणे येथे कोणाचीतरी वाट पाहत थांबलेला आहे.
राहुल खंडाळे, शंकर कुंभारे पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग, संदिप पाटील, संदिप तळेकर, रवी लोखंडे,विशाल जाधव, राहुल मोरे, कल्याण बोराडे, हिंमत होळकर, नितीन जाधव, प्रवीण गव्हाणे, सागर घाडगे,महेंद्र पवार यांचे पथकाने केली आहे.