पुण्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे दिग्गज नेते अनिस सुंडके यांनी AMIM मध्ये केला प्रवेश. कॉग्रेसच्या गोठ्यात खळबळ.

0
Spread the love

उद्याच पुढची दिशा जाहिर करणार, अनिस सुंडके.

पुणे सिटी टाईम्स ( PCT) अजहर खान

पुणे शहरात सध्या लोकसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे.तर अनेक पक्षाचे कार्यकर्ते आप आपल्या परिणे पक्षाचे काम करत आहे. यात कॉग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर अनेकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे.

तर राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये कित्येक वर्षे काम केलेले अनिस सुंडके हे माजी नगरसेवक व माजी स्थायी समितीचे अध्यक्ष होते.तर २०१७ च्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांची पत्नी हमीदा सुंडके हे निवडून आल्या होत्या.तसेच सुंडके यांचा अभ्यास व जनसंपर्क दांडगा असल्याने ते कुठेतरी नाराज असावे?

म्हणून अनिस सुंडके यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या समक्ष AMIM मध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.आता उद्याच पुढची दिशा जाहिर करणार असल्याचे अनिस सुंडके यांनी पुणे सिटी टाईम्सशी चर्चा करताना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here