पुढच्या शुक्रवारी बत्ती गुल झाल्यास अधिकाऱ्यांना घेरून टाळे ठोकणार.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.
दर शुक्रवारी विज गायब होत असल्याने कोंढव्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कोंढव्यातील बहुतांश भागात दर शुक्रवारी सकाळी – सकाळी बत्ती गुल होत असल्याने घरातील सर्व कामे प्रलंबित राहत आहे. तसेच सकाळी वीज गेल्याने ती दुपारी ४ वाजेपर्यंत येत नसल्याने नागरिकांची पंचायत होते.
तर कधी कधी शुक्रवारच्या दिवशी सायंकाळ पर्यंत वीज गायब असल्याने कोंढव्यातील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. तर एमईसीबी ( महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) चे अधिकारी मस्त पैकी आम्हाला काही देणे घेणे नाही? असे त्यांचे कामकाज होते.
विषेश म्हणजे दर शुक्रवारी नमाजची वेळेतच बत्ती गुल होत असल्याने, एमईसीबी चे अधिकारी व कर्मचारी हे जातीवाद तर करत नाही ना? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. या बाबतीत अधिक माहितीसाठी एमईसीबी अधिकाऱ्यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
तीन तासांपेक्षा जास्त वेळ वीज बंद असल्यास भरपाई मिळते.
पुणे शहरात तीन तासांपेक्षा जास्त वेळ वीज पुरवठा खंडीत असेल तर नागरिकांना ( ग्राहकांना ) भरपाई मिळते. त्यासाठी नागरिकांनी वीज गेल्या गेल्या एमईसीबीच्या कस्टमर केअर नंबर संपर्क साधून वीज गेल्याची कल्पना देण्यात यावी. आणि तक्रार क्रमांक नक्की घेण्यात यावा.तीन तासापर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर प्रती तासाला ५० रुपये भरपाई म्हणून नागरिकांना ( ग्राहकाला) मिळते.