वानवडी पोलिसांचा बोलबाला रात्री ३ वाजे पर्यंत हुक्का पार्लर खोल दाला.! समाजिक सुरक्षा विभाग कुठेय?

0
Spread the love

वानवडी पोलिसांच्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत चालतीय हुक्का पार्टी.

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

एखाद्या गरिबाने दिवसभरात धंदा झाला नाही म्हणून थोडे उशिरापर्यंत हॉटेल, दुकाने चालू ठेवले तर पुणे शहर पोलिस कारवाईचा दंडुका उगारतात, परंतु गरिबांवर कायद्याचा धाक दाखवणारे वानवडी पोलिस रात्री ३ वाजेपर्यंत हुक्का पार्टीवर गप्प का? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कमेला जवळ “जशन रेस्टॉरंट” मध्ये रात्री ३ वाजेपर्यंत हुक्का पार्टी जोमात सुरू असताना, सदरील पार्टी वर वानवडी पोलिसांचे सोईस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर समाजिक सुरक्षा विभागाची पण कारवाई म्यान करण्यात आली आहे.

सध्या वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे फोफावले असतानाही “सासु ” (समाजिक सुरक्षा विभाग) ने काळा चष्मा घालून आंधळ्यांचा सोंग घेत अवैध धंद्यांना व रात्री जशन रेस्टॉरंट मध्ये चालणाऱ्या हुक्का पार्टीला एक प्रकारे अभयच दिला असल्याची चर्चा वानवडी परिसरात सुरू आहे.

याबाबतीत माहिती घेतली असता वानवडी पोलिस ठाण्यातील अमजद “भाई” वसुली करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. तर “पुणे सिटी टाईम्स”ने वानवडी पोलिसांच्या कारभारा विरोधात आवाज उचलल्याने स्वतःला भाई म्हणून मिरवणाऱ्याने बातमीदारावर दबाव आणून, स्वतःच्या वसुली बाबतीत उघडकीस आणणाऱ्या प्रकरणावर पडदा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु अशा वसुली बहाद्दार भाई च्या धमकीला भिक घालत नाही? रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हुक्का पार्टीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार हे कारवाईचा बडगा उगारणार का? असा प्रश्न आज उपस्थित झाला असून, जशन रेस्टॉरंटला उशिरापर्यंत चालवण्याचा आशिर्वाद देणाऱ्या त्या वसुली बहाद्दारावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here