पुणे शहरात एकुण ४ हजार ९७० किलो १० लाखांचा बनावट पनीर साठा जप्त; दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरात एकुण ४ हजार ९७० किलो १० लाखांचा बनावट पनीर साठा दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेने कारवाई करत जप्त केला आहे.दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, यांना खबर मिळाली की,कर्नाटक येथुन बनावट पनीर टेम्पो मधुन पुणे येथे आणले जाते व ते पुणे शहरातील अनेक छोटया -मोठया दुकानात हॉटेल मध्ये दिले जाते.५ जूलै २०२३ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक इंदलकर व पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा टेम्पो हा वरिष्ठांचे परवानगीने कात्रज चौक पुणे शहर येथे अन्न व औषध प्रशासन कडील अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर व पथक तसेच पंचांसह सापळा रचुन टाटा कंपनीचा टेम्पो हा ताब्यात घेतला होता.

व अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी पंचांसह नमुद टेम्पोची पाहणी केली असता त्या बॉक्समध्ये एकुण ४ हजार ९७० किलो लुज पनीर साठा मिळुन आला. सदरचा माल हा अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचनामा करुन जप्त केला असुन त्या माला पैकी तपासणी करीता सॅम्पल घेण्यात आले आहेत. सदरचे सॅम्पल हे नॅशनल अॅग्रीकल्चरल अॅन्ड फुड अॅनालेसिस अॅन्ड रिसर्च इंन्स्टीटयुट (Nafari) बाणेर, पुणे येथील लॅबला पाठविले.

सदर जप्त पनीर मधील काही पॅकेट मधील पनीर हे भेसळयुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असुन त्या भेसळयुक्त व मानवी शरीरास घातक असलेल्या १० लाख रुपये किंमतीचा ४ हजार ९७० किलो लुज पनीर नाश करण्यात येत असुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत असलेबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, मोशी,यांनी गुन्हे शाखा, पुणे शहर कळविले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे पोलीस आयुक्त, रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here