रिकव्हारी वाल्यांचे चांग भलं… पोलिसांच्या आशीर्वादाने नागरिकांना नड भलं? पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे रिकव्हरी वाल्यांचे बाजार उचलणार का?

0
Spread the love

 

नागरिकांचा दिपक शिंदे विरोधात तक्रारीचा पाऊस.

प्रकरण अंगलट येत असल्याने महिलांना पुढे करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

अनेक कंपन्यांनी रिकव्हरी‌ करण्यासाठी एजंटांची नेमणूक केली आहे. तर नेमणूक करताना त्या एजंटाना नियमावली देखील ठरवून देण्यात आली आहे. परंतु एजंट स्वताचा मनमानी कारभार करून नागरिकांना धमकविणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे पर्यंत यांची मजल गेली आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे.

सॅलेसबरी पार्क येथील रिकव्हरी एंजट दिपक शिंदे यांच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रियाज मुल्ला यांनी ही तक्रार दाखल केली आहे. बँकेच्या वसुली गुंडांमुळे लोक आत्महत्या देखील करत आहेत बरेच रिकव्हरी एजंट व एजन्सी ह्या अधिकृत (DRA सर्टिफिकेट) नसून गुंड वृत्तीचे लोक घरी जाऊन शिवीगाळ करणे, रस्त्यात अडवून धमकी देणे अश्या प्रकारांमुळे लोक त्रस्त झाले आहेत.अशा रिकव्हरी एजंट व एजन्सी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

दोन दिवसांपूर्वी रियाज मुल्ला यांचा लहान भाऊ फैयाज मुल्ला हा कॅम्प मधून कोंढवा याठिकाणी येत असताना त्याला अग्निशमन (कमेला) जवळ ५ ते ६ रिकव्हरी गुंडानी रस्त्यात अडवून शिवीगाळ करत त्याला दुचाकी माघारी घेऊन गोळीबार मैदानाच्या दिशेने चालले होते. दुचाकी चालवत असताना फैयाज मुल्ला याने रियाज मुल्ला यांना कॉल केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगायला सुरुवात केली रियाज यांनी त्याला आहे त्या ठिकाणी थांबायला सांगितले आणि रिकव्हरी एजंटला कॉल द्यायला सांगितला ” त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे ” खोटे नाव शुभम ” सांगितले एजन्सीचे नाव विचारले असता त्याने श्री साई एजन्सी व रुद्र एंटरप्रायजेस सांगतिले त्याला करत असलेल्या कारवाई बाबत विचारणा केली, मे. कोर्टचा आदेश किंवा बँकेचा वसुली दाखला असेल तर आहे त्या ठिकाणी दुचाकी सोडून देऊ परंतु जर हे कायद्याच्या विरुद्ध असेल तर आपल्यावर कारवाई होईल असे सांगताच भावाला ११२ (पोलिसला कॉल) करायला सांगितले तेव्हा ते सर्वजण पळून गेले.

जाता जाता भावाने त्याच्या दुचाकीचा फोटो काढून त्यांचा पाठलाग केला आणि रियाज हे त्या एजन्सीवर गेले, शहनिशा केली ते सर्वजण त्याठिकाणी आढळून आले.तर सदर प्रकरणात या एजन्सीचे नाव क्लासिक एंटरप्रायजेस पत्ताः शॉप नं. १०, विजयमल सोसायटी, सॅलसब्ररी पार्क पुणे – ३१, मालकाचे नाव दीपक शिंदे, असून या एजन्सीने अनेक वेळा अनधिकृत पणे पाळलेल्या गुंडांच्या सहाय्याने बेकायदेशीर पणे वाहने जप्त व चोरी करण्याचे प्रकार केले आहेत अशा प्रकारे ही टोळी नाहक जनतेला वेठीस धरून पैसे उकळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

तर रियाज मुल्ला यांनी अधिक माहिती देत म्हणाले,दीपक शिंदे याने २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पंजाब कोर्टाचा खोटा शिक्का वापरून MH-12-RP-1472 रिक्षा जप्त केली होती. तसेच याच क्लासिक रिकव्हरी एजन्सी च्या गुंड कर्मचाऱ्यांनी एका नागरिकाला रस्त्यावर मारहाण करून वाहन उचलून थेट त्यांच्या गाडीवरती टाकून शहरात दहशत निर्माण करत जोर जोरात ओरडत “हार्ड रिकवरी” म्हणत बोंबा बोंब केल्याचे पाहायला मिळाले आहे.

नंबर प्लेट नसलेली दुचाकी वापरून हे वाहन उचलत आहेत. त्या लोकांवर पोलिस कारवाई मात्र होत नाही. याबाबत अनेक तक्रारी देखील झाल्या आहेत. या एजन्सी चालकाकडे कोणताही परवाना नसून (DRA सर्टिफिकेट) स्वतःच विना नंबर प्लेटची गाडी वापरून वाहने उचलण्याचे काम हे करत आहेत. माझ्या भावाच्या गाडीचे TVS फायनान्स कडून तडजोड झाली असून त्याची रीतसर पावती असताना देखील ५ ते ६ रिकव्हरी गुंडानी भर रस्त्यात अडवून शिवीगाळ करत त्याला दुचाकी त्यांच्या हद्दीत (कार्यालयावर) जबदस्तीने घेऊन जात होते.

तर जस्टीस राम प्रसाद पटना हायकोर्टाचे आदेश आहेत कि, रस्त्यात वाहन अडवून कारवाई करता येणार नाही असे झाले तर पोलिसांना रिकव्हरी एजन्सीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत असे असताना देखील या गुंड वृत्तीच्या एजन्सी चालकाला भीती का नाही ? यांना कोण पाठिशी घालतंय? पोलिसच अश्या लोकांना पाठिशी घालत असेल तर दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दिपक शिंदे च्या अंगलट विषय येत असल्याने तो आता महिलांना पुढे करून खोटं गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे? हे एका व्हिडिओतून दिसून येत आहे. शिंदे याची क्लासिक इंटरप्रायजेसची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here