फुल हार्ड रिकव्हरी …. पुण्यात रिकव्हरीवाल्यांचे चांगभलं, दुचाकीवर दुचाकी घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.पोलिस आयुक्त कारवाई करणार का?

0
Spread the love

रिकव्हारी करणारे घेत आहेत गुन्हेगारांची साथ.

पुणे सिटी टाईम्स ( PCT ) प्रतिनिधी.

पुणे ;- शहरात काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारांना कायद्यात राहण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी थेट पोलीस आयुक्तालयातच परेड काढली. त्यानंतर शहरात गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचे वातावरण देखील झाले. त्यानंतर व बेकायदेशीर धंदे देखील बंद पाडण्यात आले.परंतु सगळच होत असताना मात्र रिकव्हरी वाल्यांना पोलीस आयुक्तांची काहीच भीती नसल्याचे वातावरण सध्या पुण्यात पाहायला मिळाले.

पुण्यातील क्लासिक रिकव्हरी एजन्सी च्या गुंडगिरी करणारे कर्मचाऱ्यांनी एका नागरिकाला रस्त्यावर मारहाण करून गाडी उचलून थेट त्यांच्या गाडीवरती टाकून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.अक्षरशः गाडी उचलल्यानंतर त्यांनी गाडी मालकाला देखील अतिशय नाहक मारहाण केल्याचं चित्र आहे. त्याच सोबतीला गाडी उचलल्यानंतर गाडीवर गाडी टाकून ज्यावेळेस नेत होते त्यावेळेस याचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला आणि त्यामध्ये जोर जोरात ओरडत ” हार्ड रिकव्हरी “
म्हणत बोंबा बोंब केल्याचे पाहायला मिळाले.

नाना पेठेतील गुन्हेगारांसोबत जिगरी मैत्री असल्याने नाना पेठेतील गुन्हेगारामुळे या रिकव्हरी करणाऱ्यांची दहशत वाढली आहे.तर पुणे शहर पोलीस रिकव्हरी धारकांना पाठीशी घालत असल्याचे देखील चित्र पाहायला मिळत आहे. हे रिकव्हरी एजन्सी मध्ये काम करत असलेले मुलं अबरार सय्यद उर्फ दत्ता, सलमान, जावेद,अली  समजत आहे.

तर या रिकव्हरी करणाऱ्यांना स्थानिक पोलीस मदत करत असल्याचे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळाले आहे.ज्यावेळी एखाद्याची गाडी नियमाच्या पलीकडे रिकव्हरी केली जाते त्यावेळेस तक्रारदार पोलीस ठाण्यात जातो आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगतो, परंतु पोलीस त्यांची समजुत काढून काहीतरी बोलून त्याला परत माघारी पाठवून,आपण ज्याचे मिठ खाल्लं आहे त्याला मदत केल्याचे दाखवून देत आहे.

गुलटेकडी सॅलेसबरी पार्क येथील रिकव्हरी करणारा एंजट दिपक शिंदे हा क्लासिक इंटरप्रायजेस नावाची दुकान थाटून आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहे. तर छोट्या छोट्या टपोरी गॅंगला हाताशी धरून रिकव्हरी करत आहे. तर रिकव्हरी करणारी टपोरी गॅंग नागरिकांना मारहाण, दमदाटी, शिवीगाळ करत असल्याचे पाह्यला मिळाले. तर एखाद्या व्यक्ती त्यांना जड जात असल्यास नाना पेठेतील ” भाई” चा नाव घेऊन लोकांना भिती दाखवून पैसे वसूली करत आहे.

गुंडगिरी झाली, पुण्यात दहशत कमी झाली, पण रिकवरी वाल्यांना काहीच पोलिस आयुक्तांची भीती नाही? पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील रिकव्हरी करणाऱ्या दिपक शिंदेची कुंडली काढून, त्याच्या चिल्लर गॅंगवर कडक कारवाई करून पुण्यातून हद्द पार करावे.अशी मागणी दलित पँथर ऑफ इंडियाचे इलियास शेख यांनी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here