काय म्हणतायत राव.. पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्री २ खून.

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी.

पुणे शहरातील फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत २ खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. गणेश पेठेतील बुरूड आळी येथे युवकाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवार पेठेत आणखीन एक खूनाची घटना घडली आहे.

आई सोबत संबंध असल्याचे कारणाने मनात राग धरुन आईच्या प्रियकराचा डोक्यात फरशी मारुन खून केल्याची घटना मंगळवार पेठेतील लाकडी वखारी समोर रविवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक करुन ताब्यात घेतले आहे.

पुढील बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा }}} pune crime | पुण्यातील गणेश पेठेतील बुरूड आळी मध्ये युवकाचा पूर्ववैमनस्यातून खून, परिसरात दहशतीचे वातावरण

प्रतीक ऊर्फ लल्या पृथ्वीराज कांबळे वय ३२ रा. मंगळवार पेठ, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकुळ नंदू चव्हाण वय २०, रा. मंगळवार पेठ, याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी श्रीराज सोनू भारत पाटोळे वय-१९ रा. मंगळवार पेठ याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. मयत प्रतीक याचे एका आरोपीच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे आरोपी आणि प्रतिक यांच्यात वाद झाला होता. यानंतर अनेकवेळा त्यांच्यात वाद झाले होते. प्रतिक याने आरोपीला मारहाण देखील केली होती. याचा राग आरोपीच्या मनात होता. रविवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक व आरोपी सोनू मुलगा गप्पा मारत थांबले होते.

त्यावेळी आरोपींनी दारू पिलेली होती. त्यावेळी त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरोपी सोनू आणि त्याच्या साथीदाराने प्रतीकच्या डोक्यात फरशी मारली. फिर्यादी प्रतीकला सोडवण्यासाठी गेला असता आरोपीने ‘मला सोड मी खूप वैतागलो आहे मला काय त्रास आहे मलाच माहिती’, असे म्हणत फरशी मारली.तर अल्पवयीन मुलाने त्याठिकाणी असलेला दगडी उखळ प्रतीकच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले.प्रतीकला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here